S M L

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जिल्हा परिषदेच्या 10 शाळा बंद करण्याचे आदेश!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या 10 शाळा बंद करण्याचे आदेश पनवेल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दिले आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 5, 2018 11:30 AM IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जिल्हा परिषदेच्या 10 शाळा बंद करण्याचे आदेश!

विनय म्हात्रे, 05 मे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या 10 शाळा बंद करण्याचे आदेश पनवेल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दिले आहे. या विद्यार्थ्यांचे स्थलांतर पुष्पकनगर येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन शाळेत करण्यात सांगितले आहे. पण यावरून आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प तडीस नेण्यासाठी सरकार आता मुलांच्या शिक्षणाशी खेळतंय. सरकार एक दोन नाही तर १० शाळा बंद करणार आहे. त्यामुळ सुमारे १००० विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळण्याचा प्रयत्न करतेय असंच म्हणावं लागेल.

ग्रामस्थांना घरं कसं सोडायला लावायची तर त्यांना मेटाकुटीस आणुन कितीही प्रयत्न केले तरी लोक घरं सोडत नाहीयेत. म्हणुन शाळा बंद करण्याचा डाव सरकारने खेळलाय असा आरोप केलाय ग्रामस्थांनी केला आहे.नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना आपली घरं, जमिनी, पारंपारीक व्यवसाय, मासेमारी या सगळ्यावर पाणी सोडावं लागतंय आणि त्यातच आता हा प्रश्न आहे भावी पिढीच्या भविष्याचा. नविन शाळा ही गावापासुन किमी अंतरावर आहे. त्यामुळे शाळा बंद केल्यानंतर कदाचित अनेकांना कायमची शाळा सोडावी लागेल.

घरं खाली करावी यासाठी ग्रामस्थांवर सगळ्याच पद्धतीने सिडको दबाब आणतंय. यापूर्वी घरे खाली करीत नसल्याने सिडकोने 47 सुरक्षा रक्षकांना आपल्या आस्थापनेतून काढून टाकलं आहे आणि आता सिडको विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरे खाली करण्याचा डाव खेळत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2018 11:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close