मुंबईकरांनो, आज 'सावली'ही साथ सोडणार!

मुंबईकरांनो, आज 'सावली'ही साथ सोडणार!

दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सावली अदृश्य होणार

  • Share this:

15 मे : माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसलं तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते, असं म्हटलं जातं. मात्र आज, ही सावली आपली साथ सोडणार आहे. आपली स्वत:ची सावली अदृश्य झाल्याचा अनुभव मुंबईकरांना आज सोमवारी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी घेता येणार आहे.

यावेळी उन्हात उभं राहिल्यास सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश्य झालेली असल्याचा अनुभवता घेता येणार आहे.

सावली ही कधीच आपली पाठ सोडत नाही, असं म्हणतात खरं, पण निसर्ग आणि भूगोलातील काही घडामोडींमुळे सावलीही आपली पाठ सोडणार असल्याचा अनुभव मुंबईकरांना सोमवारी मध्यान्ही म्हणजे ठीक 12 वाजून 35 मिनिटांनी येणार आहे. सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने  सावली अगदी पायाशी आल्याने अदृश्य होणार असल्याची माहिती मुंबईच्या नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली आहे.

माणसाची सावली अदृश्य होण्याच्या या प्रकाराला वैज्ञानिक भाषेत ‘शून्य सावली दिवस’ (झिरो शॅडो डे) असं म्हटलं जातं. वर्षांतून दोन वेळा आपल्याला हा अनुभव घेता येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2017 08:48 AM IST

ताज्या बातम्या