मराठा समाजातील तरुणांना शून्य व्याजदराने कर्ज, सरकारकडून दिवाळी भेट

मराठा समाजातील तरुणांना शून्य व्याजदराने कर्ज, सरकारकडून दिवाळी भेट

दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणार आहे.

  • Share this:

24 आॅक्टोबर : राज्य सरकारने मराठा समाजाला मोठा दिलासा दिलाय. मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारांसाठी शून्य व्याजदरावर कर्ज देण्याचा निर्णय घेऊन सरकारने खास दिवाळी भेट दिलीये.

मराठा क्रांती मोर्चानंतर राज्य सरकारने दखल घेत अनेक मागण्यांचं आश्वसानं दिलं होतं. मराठा आरक्षणाचा निर्णय अद्याप न्यायालयात आहे. दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारांसाठी शून्य व्याजदरावर कर्ज मिळणार आहे.

दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. तसंच कर्जाची मर्यादा 50 लाखापर्यंत असणार आहे.

मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानूसार स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे मराठा समाजातील तरुणाचा व्यवसायासाठी मोठा दिलासा मिळालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2017 08:42 PM IST

ताज्या बातम्या