मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Corona चे नियम शिवसेनेसाठी नाहीत? Congress आमदार झिशान सिद्दीकींची पुन्हा टीका

Corona चे नियम शिवसेनेसाठी नाहीत? Congress आमदार झिशान सिद्दीकींची पुन्हा टीका

zeeshan siddique twitter झिशान सिद्दीकी यांनी यापूर्वीही त्यांना उद्घाटन कार्यक्रमात आमंत्रित केलं नाही म्हणून शिवसेना आणि अनिल परब यांच्यावर टीका केली होती.

zeeshan siddique twitter झिशान सिद्दीकी यांनी यापूर्वीही त्यांना उद्घाटन कार्यक्रमात आमंत्रित केलं नाही म्हणून शिवसेना आणि अनिल परब यांच्यावर टीका केली होती.

zeeshan siddique twitter झिशान सिद्दीकी यांनी यापूर्वीही त्यांना उद्घाटन कार्यक्रमात आमंत्रित केलं नाही म्हणून शिवसेना आणि अनिल परब यांच्यावर टीका केली होती.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 मे : काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी (Congress MLA Zeeshan Siddiqui) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. झिशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघात एका लसीकरण केंद्राच्या (Vaccination center) उद्घाटन कार्यक्रमात त्यांना आमंत्रित न केल्यानं नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा फोटो पोस्ट करत लसीकरण केंद्राच्या उद्घाटनात होणाऱ्या गर्दीवरून टीका केली आहे.

(वाचा-कोरोना लस, ऑक्सिजनसोबत पंतप्रधान मोदीही गायब झालेत; राहुल गांधींची टीका)

वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी एक ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली. राज्यात सगळीकडे कलम 144 लागू करण्यात आलेलं असताना शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मात्र लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी गर्दी करत असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे. म्हणजे नियम हे फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत आणि शिवसेनेसाठी नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच लसीकरण केंद्रामध्ये केवळ एका जणाला लस दिली जात आहे. मात्र अनेक लोकं फोटो काढत असल्याचं म्हणत त्यांनी या सोहळ्यावर टीका केली आहे. हे ट्वीट करत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, आदित्य ठाकरे आणि मुंबई मनपाला टॅग केलं आहे.

यापूर्वीही केली होती टीका

यापूर्वीही झिशान सिद्दीकी यांनी अशाचप्रकारे शिवसेना नेत्यांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. सिद्दीकी यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पूर्वमध्ये काही दिवसांपूर्वी एका लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं होतं. पण प्रोटोकॉल असूनही येथील आमदारांनाच म्हणजे सिद्दीकी यांना आमंत्रित करण्यात आलं नाही. त्यावर झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानं त्यांनी परब यांनाही सुनावल्याचं पाहायला मिळत होतं.

(वाचा-Coronavirus :...तर लसींचा तुटवडा जाणवलाच नसता, नाना पटोलेंची मोदींवर टीका)

झिशान सिद्दीकी आणि शिवसेना यांच्यातील वाद हा काही नवा नाही. या मतदारसंघामध्ये झिशान सिद्दीकी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईचे तेव्हाचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यावेळीही शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने होती. पण निवडणुकीनंतर बदललेल्या परिस्थितीत दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. मात्र तसं असलं तरी स्थानिक स्तरावरील राजकारण बदललेलं नसल्याचं पाहायला मिळतंय.

First published:

Tags: Congress, Mumbai News, Shivsena