झायरा वसीम विनयभंग प्रकरण : आरोपी विकास सचदेवची पत्नी म्हणते माझा पती निर्दोष

अभिनेत्री झायरा वसीम विनयभंग प्रकरणात एकाला अटक झालीये. विकास सचदेव असं या अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं वय 39 वर्षं आहे. मुंबईच्या अंधेरी भागातून त्याला काल रात्री अटक झाली. सहार पोलिसांनी ही कारवाई केली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2017 03:34 PM IST

झायरा वसीम विनयभंग प्रकरण : आरोपी विकास सचदेवची पत्नी म्हणते माझा पती निर्दोष

11 डिसेंबर : अभिनेत्री झायरा वसीम विनयभंग प्रकरणात एकाला अटक झालीये. विकास सचदेव असं या अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं वय 39 वर्षं आहे. मुंबईच्या अंधेरी भागातून त्याला काल रात्री अटक झाली. सहार पोलिसांनी ही कारवाई केली.

माझ्याकडून अनावधानानं झायराला स्पर्श झाला, मी जाणीवपूर्वक केलं नाही. दिल्लीमध्ये नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून मी परतत होतो, खूप थकलो होतो आणि त्यामुळे मला गाढ झोप लागली. झोपेत माझ्याकडून ही चूक झाल्याचा त्याचा दावा आहे. पण आमचा या दाव्यावर विश्वास नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. डीसीपी अनिल कुंभारे यांनी ही माहिती दिली.

आरोपीचा दावा काय ?

- माझ्याकडून हे कृत्य अनावधानानं झालं. दिल्लीला मी एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेलो होतो. खूप थकल्यामुळे मी प्रवासात पूर्ण वेळ झोपलो होतो. माझ्याकडून अनावधानानं झायराला स्पर्श झाला. माझा असा कोणताही हेतू नव्हता. मी माफी मागतो.

Loading...

विस्तारा एअरलाईन्सची भूमिका

- या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सर्व संबंधित यंत्रणांशी आम्ही सहकार्य करतोय. त्याचबरोबर, घटनेचा प्राथमिक माहिती अहवाल आम्ही डीजीसीएला पाठवला आहे. पोलिसांनाही आम्ही सविस्तर माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची खबरदारी घेणं याला आम्ही सर्वात जास्त महत्त्व देतो.

दरम्यान आरोपी विकास सचदेवची पत्नी दिव्या मीडियासमोर आली आहे. माझा पती निर्दोष आहे. तो झोपला होता, आणि झोपेत त्याच्याकडून झायराला स्पर्श झाला. आम्ही सगळे झायराची माफी मागतो, असं दिव्यानं म्हटलंय. आणि जर माझ्या पतीनं असं केलं असेल, तर मग झायरानं तेव्हाच आवाज का नाही उठवला ?  विस्ताराच्या कर्मचाऱ्यांकडे त्याच क्षणी तक्रार का नाही केली, असे सवालही दिव्या सचदेवनं उपस्थित केलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 03:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...