राजेंचा साधेपणा, मराठा मोर्च्यात कार्यकर्त्यांसोबत मांडी घालून बसले

राजेंचा साधेपणा, मराठा मोर्च्यात कार्यकर्त्यांसोबत मांडी घालून बसले

संभाजीराजे आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत मैदानावर मांडी घालून खाली बसले.

  • Share this:

09 आॅगस्ट : राज्यसभा खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चात सहभागी झाले. विशेष म्हणजे संभाजीराजे आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत मैदानावर मांडी घालून खाली बसले.

आझाद मैदानावर मराठा मोर्चा दाखल झाला. राज्यभरातून आलेले लाखो कार्यकर्ते आझाद मैदानावर एकवटले आहे. सर्वपक्षीय आमदारही मोर्चात सहभागी होणार आहे. नेहमीप्रमाणे  खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चात सहभागी झाले. जेव्हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचला तेव्हा  युवराज संभाजीराजे जमिनीवर खाली बसले. कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून संभाजीराजे खाली बसून आपण फक्त एक कार्यकर्ते आहोत असा आदर्शच दिला.

विशेष म्हणजे,  70 टक्के मराठा समाज हा गरीब असल्याने त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि एक निश्चित अशी डेडलाईन ठरवावी, अशी अपेक्षा राज्यसभा खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2017 01:14 PM IST

ताज्या बातम्या