मराठा आरक्षणासाठी सरकारने डेडलाईन ठरवावी-संभाजीराजे

मराठा आरक्षणासाठी सरकारने डेडलाईन ठरवावी-संभाजीराजे

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ही एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे त्यामुळे त्यांनी सर्वोतपरी प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावावा, असंही संभाजीराजे म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 8ऑगस्ट : 70 टक्के मराठा समाज हा गरीब असल्याने त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि एक निश्चित अशी डेडलाईन ठरवावी, अशी अपेक्षा राज्यसभा खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केलीय. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आयबीएन लोकमतने त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. त्यात त्यांनी मराठा मोर्चासंबंधीच्या सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने एक विशेष समिती स्थापन करावी, त्या समितीत सर्व समाज घटकांचे प्रतिनिधी असावेत असंही संभाजी राजेंनी म्हटलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उदयन राजेंनी या आंदोलनात सोबत यावं, मी त्यांच्यासोबत काम करायला तयार आहे. असंही संभाजी राजे म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ही एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे त्यामुळे त्यांनी सर्वोतपरी प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावावा, असंही संभाजीराजे म्हणाले.

पंतप्रधानांनी आमच्या छत्रपती घराण्याचा सन्मान म्हणून ही राज्यसभेची खासदारकी दिलेली आहे. मी भाजपचा सध्या सहयोगी सदस्य असलो तरी भाजपात जायचं की नाही यावर थेट भाष्य करणं मात्र त्यांनी खुबीने टाळलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 10:53 PM IST

ताज्या बातम्या