S M L

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? हा असेल मतदारसंघ!

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 27, 2019 02:55 PM IST

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? हा असेल मतदारसंघ!

मुंबई, 27 मे: लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेने युतीने दणदणीत असा विजय मिळवत विरोधकांच्या तोंडचे पाणी पळवले. आता विधानसभेच्या दृष्टीने पुन्हा एकदा युतीने तयारी सुरु केली आहे. अशातच शिवसेनेचे युवा नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीही निवडणूक लढवलेली नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणुक लढवणार नसल्याचे म्हटले होते. पण आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात याआधीच स्पष्ट केले होते की, निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरे यांचाच असेल.

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवरुन ही मागणी केली आहे. वरुण हे आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू देखील आहेत, त्यांनी इंस्टाग्रामवरून ही मागमी केली आहे. 'हीच वेळ आहे..हीच संधी आहे.. लक्ष्य - विधानसभा २०१९ !! महाराष्ट्र वाट पाहतोय', असा उल्लेख करत त्यांनी आदित्य ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांना टॅग देखील केले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक होत आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. विधानसभेसाठीच्या याबैठकी आधीच आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्यासंदर्भातील बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यात आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात निवडणूक लढवण्यासंदर्भातील मोठी घोषणा केली जाऊ शकते.


View this post on Instagram

हीच वेळ आहे..हीच संधी आहे.. लक्ष्य - विधानसभा २०१९ !! महाराष्ट्र वाट पाहतोय @adityathackeray !

A post shared by Varun Satish Sardesai (@varunsardesai) on


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या नेत्यांच्या बैठकीसाठी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीच्यावेळी आदित्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसले होते.

हा मतदारसंघ योग्य

Loading...

आदित्य ठाकरे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर ते कोणत्या मतदारसंघातून लढतील याबाबत देखील चर्चा सुरु झाली आहे. युवासेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे पूर्व हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी योग्य ठरू शकतो. याच मतदारसंघात ते राहतात. तसेच या भागात त्यांचे काम देखील आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यासाठी वांद्रे पूर्व हा मतदारसंघावर शिक्कामोर्तब होण्याची अधिक शक्यता आहे. अर्थात यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

याआधी उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे निवडणूक लढवायची की नाही याची निर्णय फक्त आणि फक्त आदित्य ठाकरेच घेतील. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता आदित्य ठाकरे कोणता निर्णय घेतील याकडे लागले आहे.


VIDEO: इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकनं घेतला अचानक पेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2019 02:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close