Elec-widget

'ठाकरे' पहिल्यांदाच निवडणूक लढणार; विधानसभेच्या आखाड्यात आदित्य यांची एण्ट्री

'ठाकरे' पहिल्यांदाच निवडणूक लढणार; विधानसभेच्या आखाड्यात आदित्य यांची एण्ट्री

आदित्य यांची निवडणुकीच्या आखाड्यातली एण्ट्री हा शिवसेनेच्या इतिहासातला हा एक मोठा निर्णय ठरणार आहे.

  • Share this:

मुंबई 30 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक दशकं रिमोट कंट्रोल हाती ठेवणाऱ्या ठाकऱ्या घराण्याची तिसरी पिढी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आदित्य ठाकरेंनी स्वत:च याची घोषणा केलीय. शिवसेनेच्या मुंबईत झालेल्या संकल्प मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केली. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं आदित्य यांचा मार्ग मोकळा झाला. त्यासाठीच अहिर यांना आपल्याकडे शिवसेनेनं वळवलं अशीही चर्चा आहे. शिवसेनेच्या इतिहासातला हा एक मोठा निर्णय ठरणार आहे.  निवडणुकीच्या राजकारणात मी उतरणार नाही असं बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. मात्र आदित्य ठाकरे यांनी तो संकेत मोडून ते आता थेट विधिमंडळात प्रवेश करणार आहेत.

भाजप सेना युतीवर शिक्कामोर्तब होणार; नेमका काय आहे फॉर्म्युला?कुणी केलाय त्याग?

दरम्यान स्वत: संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेत वरळीतून बिनविरोध निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्याचं साकडं घातलंय. त्यामुळे पवार काय निर्णय घेतील त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेनेच्या या मेळाव्याला उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. मात्र रश्मी ठाकरे वार्जुन उपस्थित होत्या. आईच कार्यक्रमात मंचावर असल्यानं आपल्याला बोलताना काही सुचत नाही असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

रवी राणा-नवनीतकौर राणांना 'युती'चा बसला मोठा फटका, राष्ट्रवादीच्या वाटेवर?

आदित्य यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नाही अशी शक्यता आहे. या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे सूर्ययान असल्याचं सांगितलं. विधानसभा निवडणुकीनंतर हे सूर्ययान मंत्रालयातल्या 6 व्या मजल्यावर उतरणार आहे असंही ते म्हणाले.

Loading...

नारायण राणेंना बालेकिल्ल्यातच धक्का, 24 वर्ष साथ देणाऱ्या नेत्याने सोडली साथ

AB फॉर्म चं युतीच्या घोषणेपूर्वीच वाटप

शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील मतदारसंघातील उमेदवारांना आज घटस्थापनेच्या मुहुर्तावर AB फार्म वाटले. मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील जे उमेदवार मुंबईत उपस्थित आहेत. त्यांना देखील AB फॉर्म देण्यात आलेत. सध्या युतीत ज्या मतदारसंघाचा जागावाटपाचा प्रश्न सुटलेला आहे. अशाच मतदारसंघातील उमेदवारांना शिवसेना AB फॉर्म देत असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...