S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

मंत्रालयातील ड्रामा संपला, सज्जावर चढलेल्या तरुणाला खाली उतरवलं

मंत्रालयात आज दुपारी हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला

Sachin Salve | Updated On: Nov 10, 2017 06:54 PM IST

मंत्रालयातील ड्रामा संपला, सज्जावर चढलेल्या तरुणाला खाली उतरवलं

10 नोव्हेंबर :मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या सज्जावर चढून आत्महत्येची धमकी देणाऱ्या तरुणाला अखेर खाली उतरवण्यात पोलिसांना यश आलंय. ज्ञानेश्वर साळवे असं या तरुणाचं नाव आहे.

राज्याचा गाडा हाकला जाणाऱ्या मुंबईतील मंत्रालयात आज दुपारी हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. एक तरुण थेट सातव्या मजल्याच्या सज्जावर जाऊऩ उभा राहिला. काही क्षणातच एक तरूण सातव्या मजल्यावर चढल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या तरुणाला खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी पोहोचली.

ज्ञानेश्वर साळवे असं या तरुणाचं नाव आहे. त्याने सज्जावरुन खाली एक चिठ्ठी फेकली. या चिठ्ठीत त्याने कृषीमंत्र्यांना भेटीची मागणी केली जर भेटू दिलं नाहीतर आत्महत्या करणार अशी धमकी दिली होती. तब्बल दोन तासांहुन अधिक चाललेल्या या हायहोल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वरची समजूत काढली आणि खाली उतरवलं. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने हे का कृत्य केलं याची चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close