प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं पण घरच्यांनी लक्ष दिलं नाही, युवकाने आयुष्य संपवलं

प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं पण घरच्यांनी लक्ष दिलं नाही, युवकाने आयुष्य संपवलं

बहिणीच्या नणंदेसोबत प्रेम संबंध असलेल्या युवकाचे कुटुंबिय लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याने चिंताग्रस्त असलेल्या युवकाने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भादवड इथे घडली आहे.

  • Share this:

भिवंडी, 25 मार्च : प्रेमाला कोणत्याही सीमा नाहीत. ते कोणावरही आणि कधीही होऊ शकतं. पण हेच प्रेम हल्लीच्या तरुणाईसाठी जीवघेणं ठरत आहे. याचं जीवंत उदाहरण मुंबईच्या भिवंडीमध्ये समोर आलं आहे. बहिणीच्या नणंदेसोबत प्रेम संबंध असलेल्या युवकाचे कुटुंबिय लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याने चिंताग्रस्त असलेल्या युवकाने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भादवड इथे घडली आहे.

शमशाद अली कैसर अली शाह ( २४ ) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नांव आहे. त्याचे दिल्लीस्थित असलेल्या बहिणीच्या नणंदेशी दोन वर्षांपासून त्याचे प्रेम संबंध होते. याबद्दल त्याने घरी सांगत लग्नाची बोलणी करण्याचा तगादा लावला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. हे शमशादला सहन झालं नाही आणि त्याच नैराश्यातून त्याने स्वत:चं आयुष्य संपवलं आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे शमशादने यापूर्वी कुटूंबियांना आत्महत्येची धमकीही दिली होती. मात्र तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर चिंताग्रस्त असलेल्या शमशादने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास पोउनि होनाजी चिरमाडे करीत आहे.

दरम्यान, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पण सात जन्म एकमेकांना वचन देण्याआधीच शमशादने आत्महत्या केल्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या अशा जाण्यावर संपूर्ण परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

VIDEO: महिलेची छेड काढणाऱ्या साधूला नागरिकांनी फलाटावरच दिला प्रसाद

 

First published: March 25, 2019, 9:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading