SPECIAL REPORT : लघुशंकेच्या कारणावरून झाला वाद, पती-पत्नीवर केले सपासप वार!

नंदलाल कनौजियांच्या हत्येमुळं आणि त्यांची पत्नी उर्मिला गंभीर जखमी असल्यानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 09:43 PM IST

SPECIAL REPORT : लघुशंकेच्या कारणावरून झाला वाद, पती-पत्नीवर केले सपासप वार!

सत्यम सिंग, प्रतिनिधी

मुंबई, 07 नोव्हेंबर : मुंबईत लघुशंकेच्या क्षुल्लक कारणावरून नंदलाल कनौजियांची हत्या करण्यात आली. तर त्यांची पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केलीय.

नंदलाल कनौजियांच्या हत्येमुळं आणि त्यांची पत्नी उर्मिला गंभीर जखमी असल्यानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. कनौजिया यांच्या कुटुंबाला अमित सौरव या नराधमाची दृष्ट लागली.

गुरूवारी पहाटे अमित सौरव हा नंदलाल कनौजियांच्या दुकानासमोर लघुशंका करत होता. हे नंदलाल यांची पत्नी उर्मिला यांनी पाहिलं. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी अमित सौरवनं त्याच्या एका मित्राला बोलावलं. बाचाबाचीचं रूपांतर भांडणात झालं आणि अमितनं नंदलाल कनौजिया, उर्मिला कनौजिया यांच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या नंदलाल यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी उर्मिला यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आरोपी अमित सौरव यानं या आधीही कनौजिया यांच्या दुकानासमोर कचरा टाकून वाद घातला होता. चाकूहल्ला करून एक संसार संपवणाऱ्या अमित सौरववर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Loading...

==========

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 09:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...