सर्पदंशानंतर 4 तासांनी आले वैद्यकीय अधिकारी, उपचाराअभावी युवकाचा मृत्यू

सर्पदंशानंतर 4 तासांनी आले वैद्यकीय अधिकारी, उपचाराअभावी युवकाचा मृत्यू

दापोली तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या युवकाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला.

  • Share this:

शिवाजी गोरे,(प्रतिनिधी)

दापोली, 21 ऑगस्ट-दापोली तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या युवकाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. पंकजला सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तब्बल चार तासांनी आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पंकजचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

मिळालेली माहिती अशी की, टेटवली गावातील मळेकर वाडी येथील पंकज कदम या युवकाला मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास विषारी सर्पदंश झाला होता. साप चावल्यानंतर पंकज याने स्वतः साप मारून भावंडांना उठवले. भावंड व काका यांच्या मदतीने दापोली शहरातील उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, येथे आल्यानंतर चार तास झाले तरी डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित झाले नाही. यानंतर एक डिलिव्हरीची केस पाहण्यासाठी डॉक्टर आले असता त्यांनी पंकजला अत्यावस्थ झाल्याचे पाहून त्याला तातडीने येथून हलवा, असे नातेवाइकांना सांगितले. यानंतर नातेवाईकांनी शहरातील एका खासगी दवाखान्यात हलवले. त्यांना चिपळूण येथील डेरवण रुग्णालय गाठले. परंतु तोपर्यंत पंकजवर मृत्यू ओढवला होता. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी सायंकाळपर्यंत दापोली पोलिस स्थानकासमोर हे आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम दापोली पोलिस स्थानकात सुरू होते.

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या