मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांचा 'कर्नाटक'वरून राडा

मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांचा 'कर्नाटक'वरून राडा

मुंबईच्या ज्या हॉटेलमध्ये कर्नाटकातल्या आमदरांना ठेवण्यात आलं त्यांना भेटू देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

  • Share this:

मुंबई 8 जुलै : कर्नाटकमधलं राजकीय नाट्य आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. राजधानी बंगळुरूमध्ये जरी वातावरण गरम असलं तरी त्याचे पडसाद मुंबई पडत आहेत. मुंबईतल्या ज्या हॉटेलमध्ये काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार वास्तव्याला आहेत त्या सोफिटेल हॉटेलसमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आजही जोरदार निदर्शने केलीत. आमदारकीचा राजीनामा दिलेले काँग्रेस-जेडीएसचे 14 आमदार या हॉटेलमध्ये मुक्कामी आले आहेत.

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर हे सर्व आमदार एका खास विमानाने मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावरून ते सरळ बीकेसीतल्या पंचतारांकित सोफिटेल हॉटेलमध्ये पोहोचले. ही बातमी कळताच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना भेटण्यासाठी हॉटेलकडे धाव घेतली. काँग्रेसचे नेते नसिम खान, भाई जगताप, एकनाथ गायकवाड या नेत्यांनी सोफिटेलमध्ये जाण्याचा रविवारी प्रयत्न केला मात्र त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

भाजप सरकारच्या इशाऱ्यावरूनच पोलीस प्रवेश नाकारत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आजही सोफिटेल हॉटेलसमोर जमा झाले. त्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट, नव्या समीकरणांचे संकेत

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे

कर्नाटकमधला राजकीय पेच आणखी चिघळलाय. बंड शांत करण्यासाठी काँग्रसच्या सर्व मंत्र्यांनी  राजीनामे दिले आहेत. काँग्रेस श्रेष्ठींनी आदेश दिल्याने सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेत. त्यानंतर जेडीएसच्या सर्व मंत्र्यांनीही राजीनामे दिले आहेत. आता बंडखोर आमदारांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांना शांत करण्याचे हे प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. तर नाराज आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता दिसत नाहीये. आणखी एका नाराज आमदाराने राजीनामा दिल्याचंही वृत्त आहे. तर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आता कुठलंही संकट नसल्याचं स्पष्ट केलं. अडचण दूर झालीय, संकट टळलं आहे, सर्व काही आलबेल आहे असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं मात्र त्यांच्या चेहेऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता.

‘कर्नाटकातील आमदार राहुल गांधींना फॉलो करत आहेत’

कुमारस्वामी यांची खुर्ची धोक्यात आली असतानाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनी भाजप आमदारांचं अपहरण करत असल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अपक्ष आमदार नागेश यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की भाजपचे नेते येदियुरप्पा यांच्या पीएने आपलं अपहरण केलं. नागेश यांना खास विमानाने अज्ञात स्थळी नेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

First published: July 8, 2019, 6:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading