मुंबई, 5 जून: Coronavirus चा प्रकोप सुरू झाल्यापासून जवळपास गेला महिनाभर मुंबईत टाळेबंदी आहे. संचारबंदी आणि इतरही अनेक निर्बंध अजूनही लागू असताना आता राजकीय हालचालींना मात्र वेळ आला आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींना विरोध करण्यासाठी युथ काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईच्या रस्त्यावर उतरले. चक्क पीपीई किट घालून त्यांनी नरिमन पॉइंट भागातल्या भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार होतं. पण त्याअगोदरच पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरलं. PPE किट घालून केलेलं हे आंदोलन त्यामुळे लक्षवेधी ठरलं.
मुंबईतल्या युथ काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं. भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचं पोलिसांना कळताच नरिमन पॉइंट भागातला बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला होता. कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी पीपीई किट घालून घोषणाबाजी केली. या आंदोलनाचा VIDEO
मुंबईत PPE किट घालून घोषणाबाजी आणि आंदोलन! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींविरुद्ध युथ काँग्रेसने भाजप कार्य़ालयासमोर हे आंदोलन केलं. पोलिसांनी साधारण 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. pic.twitter.com/iHCDzlY2az
— News18Lokmat (@News18lokmat) June 5, 2021
आमदार झिशान सिद्दीकीच्या नेतृत्वात आज पेट्रोलच्या चढ्या किमतीविरोधात युथ काँग्रेसने आंदोलन केले. भाजपच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलं जाणार होतं. पण त्याआधीच मुंबई पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.आंदोलन करू दिलं नाही.
अनलॉक संदर्भात मुंबईतील नियमावली जाहीर, पाहा काय सुरू काय बंद
भाजपच्या कार्यालयाबाहेर असा काही पोलिसांनी बंदोबस्त लावला की भाजप कार्यालयाला एखाद्या पोलीस छावणीचं स्वरूप आलं. आंदोलक भाजप कार्यालयासमोर पोहोचले नाहीत. पण घोषणाबाजी जोरदार झाली आणि पीपीई किटमुळे हे आंदोलन लक्षवेधी ठरलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai, Petrol and diesel, Petrol and diesel price