इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या भामट्यास अटक

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या भामट्यास अटक

आरोपीने पीडित विद्यार्थिनीच्या पाठीमागे उभे राहून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर हा प्रकार तरुणीच्या लक्षात आला. नंतर तिने आरडाओरड केली.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट- नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. विनोद फड (वय-30) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी तरुणाने पीडित विद्यार्थिनीकडे पाहून गुरुवारी (22 ऑगस्ट) दुपारी कॉलेजातील झेरॉक्स सेंटरसमोर हा प्रकार केला होता. नंतर कॉलेजातील तरुण व पीडित तरुणीने आरोपीला चांगला चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाले केले होते. आपोपी हा एमजीएम कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे.

मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी झेरॉक्स सेंटरमध्ये निकालाची ऑनलाइन प्रत घेण्यासाठी उभी होती. यावेळी झेरॉक्स सेंटरवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. आरोपीने पीडित विद्यार्थिनीच्या पाठीमागे उभे राहून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर हा प्रकार तरुणीच्या लक्षात आला. नंतर तिने आरडाओरड केली. त्यानंतर याठिकाणी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी आरोपीला चोप देऊन महाविद्यालयातील प्राचार्यांना या प्रकाराची माहिती दिली. कामोठे पोलिसांना पाचारण करून आरोपी विनोद फड याला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

कामोठे पोलिसांनी आरोपी विनोद फड याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला 27 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्राध्यापकांकडूनही लैंगिक छळ

कामोठे येथील इंजिनीअरिंग कॉलेजातील विद्यार्थिनीसोबत प्राध्यापकांकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कॉलेजच्या आवारात आंदोलन केले. प्रशासनाविरूद्ध घोषणाबाजी केली. प्राचार्यासह प्राध्यापकांवर कारवाईची मागणी केली. त्यामुळे परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त अशोक दुधे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॉलेजात धाव घेऊन विद्यार्थ्यांची समजूत काढली. अखेर कॉलेज प्रशासनाकडून प्राचार्यांना बडतर्फ करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

VIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2019 04:24 PM IST

ताज्या बातम्या