Home /News /mumbai /

'तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही', देवेंद्र फडणवीस गरजले

'तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही', देवेंद्र फडणवीस गरजले

तुम्हाला असं वाटत असेल माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं वजन कमी कराल. लक्षात ठेवा हा देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही,

तुम्हाला असं वाटत असेल माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं वजन कमी कराल. लक्षात ठेवा हा देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही,

तुम्हाला असं वाटत असेल माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं वजन कमी कराल. लक्षात ठेवा हा देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही,

    मुंबई, १५ मे - 'बाबरी (babari) पाडायला गेलो तेव्हा माझं वजन १२८ किलो होतं. तुम्हाला असं वाटत असेल माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं वजन कमी कराल. लक्षात ठेवा हा देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही पातळी सोडली आहे मात्र मी अजून ही पातळी सोडून बोलत नाही'अशा शब्दांत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis speech) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्यावर जोरदार टीका केली. भारतीय जनता पार्टी मुंबईच्यावतीने हिंदी भाषिक संकल्प संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या संमेलनात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला जोरदार उत्तर दिले. 'जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत होते त्यांनी तलवार म्यान केली असेल. पण आम्ही आमच्या तलवारी म्यानबंद केलेल्या नाहीत. आम्ही सामना करणार आणि खंबीरपणे करणार. मी जेव्हा म्हणालो रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये तुमचा एकही नेता नव्हता तर किती मिरची लागली? अरे मै तो अयोध्या जा रहा था, बाबरी मस्जिद गिरा रहा था, तुझे मिरची लगी तो मै क्या करु? अरे हा, मी बाबरी पाडण्याकरता गेलो होतो याचा मला अभिमान आहे. उद्धवजी 1992 साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता'अशी टीका फडणवीस यांनी केली. (watermelon rate : कलिंगडाचे दर गडगडले; ग्राहकांची रांग, शेतकरी मात्र बेहाल!) छत्रपती संभाजी राजांना औरंगाजेबाने मारले, औरंगजेब संभाजींना फक्त धर्म बदलायला सांगत होता. पण संभाजींनी धर्म बदलला नाही. संभाजी राजांनी जीव गेला तरी स्वराज्य आणि स्वधर्म देणार नाही, असं सांगितलं. संभाजी राजांची निर्घृण हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या समाधीवर तो असदुद्दीन औवेसी जातो आणि माथा टेकतो. अरे लाजा बाळगा, बघता काय? ग्लासभर पाण्यात डुबकी मारा. औवेसी ऐकून घे औरंगजेबच्या समाधीवर कुत्राही लघुशंका करणार नाही, आता पूर्ण हिंदुस्तानात भगवा फडकणार, असंही फडणवीस म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या