हिरो बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत दाखल झाला तरूण ; पण, हाती पडल्या बेड्या

एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी घटना मायानगरी मुंबईत समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 11, 2019 12:12 PM IST

हिरो बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत दाखल झाला तरूण ; पण, हाती पडल्या बेड्या

मुंबई, 11 मे : मुंबई! स्वप्ननगरी म्हणून या शहराची साऱ्या जगात ओळख आहे. लाखो लोक या शहरात नशीब आजमावण्यासाठी येतात. काही जण यामध्ये यशस्वी होतात. तर, काही जणांना अपयशाचं तोंड पाहावं लागतं. आता, या मायानगरीमध्ये एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी घटना समोर आली आहे.

उरात हिरो बनण्याचं स्वप्न घेऊन उत्तर प्रदेशातील मोहम्मद सैफ असरगर अली चौधरी मुंबईत दाखल झाला. सुरूवातीला भाड्याच्या घरात राहून त्यानं अनेक ठिकाणी ऑडिशन दिलं. चित्रपट सृष्टीत काम मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तीन वर्षापर्यंत त्याचा हा स्ट्रगल सुरू होता. पण, यश काही येत नव्हतं, काम मिळत नव्हतं. प्रयत्न सुरू होते. अशातच तीन वर्षाचा काळ लोटला. जवळचे पैसे संपले. पोटाचा प्रश्न उभा राहिला. काय करावं हेच सुचेना.


आसाममधील धार्मिक तणावात 1 ठार; सैन्याला केलं पाचारण

हिरो नाही तर तो झाला चोर

Loading...

हाती काम नाही तर खाणार काय? आणि जगणार तरी कसं? यावर आता विचार सुरू झाला. स्ट्रगल काही संपत नव्हता. त्यानंतर आता पोटाला लागलेली भूकेची आग विझवण्यासाठी मोहम्मद सैफ असरगर अली चौधरीनं निवडलेला मार्ग हिरो नाही तर त्याला झीरो करणार होता. कारण, मोहम्मद सैफ असरगर अली चौधरीनं चैन स्नॅचिंग सुरू केली होती. मोहम्मदनं 16 मंगळसुत्रांची चोरी केली होती. शिवाय, रेल्वे एक्सप्रेसमध्ये देखील त्यानं चोरी केली होती. अखेर पोलिसांनी त्यांला अटक केली. त्यानंतर त्यानं आपण केलेल्या गुन्ह्यांची देखील माहिती दिली.

कोकण रेल्वे लक्ष्य

मोहम्मद सैफ असरगर अली चौधरीचं लक्ष्य हे कोकण रेल्वे होतं. जेव्हा कोकण रेल्वे मार्गावर चोरीच्या घटना वाढल्याची तक्रारी मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या तेव्हा पोलिसांनी पाच जणांची टीम तयार केली. त्यानंतर संशयावरून मोहम्मद सैफ असरगर अली चौधरीला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली.

मोहम्मद सैफ असरगर अली चौधरीनं ठाणे, दादर, कुर्ला आणि CSMT याठिकाणी तब्बल 12 लाख 92 हजार 150 रूपयाचे दागिने लंपास केले आहे.


VIDEO: नाशिकमध्ये लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्याक्षिकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: May 11, 2019 10:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...