• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • बऱ्याच वेळ थांबली अन् लोकल येताना दिसताच रुळावर जाऊन झोपली, अंगावर शहारे आणणारा आत्महत्येचा LIVE VIDEO

बऱ्याच वेळ थांबली अन् लोकल येताना दिसताच रुळावर जाऊन झोपली, अंगावर शहारे आणणारा आत्महत्येचा LIVE VIDEO

भरधाव लोकल येत असल्याचे पाहून या तरुणीने प्लॅटफार्मवर पर्स खाली टाकली आणि रुळावर उडी मारली.

  • Share this:
मुंबई, 09 मे : मुंबईतील (Mumbai) विक्रोळी रेल्वे स्थानकावर (Vikroli railway Sation) लोकल खाली एका महिलेनं आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावर शहारे आणणार या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 मे रोजीचा हा व्हिडीओ आहे. विक्रोळी स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक 4 वर सकाळी 10.35 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. एक 27 वर्षीय महिला बराच वेळ विक्रोळी स्थानकावर बसून होती. काही वेळानंतर समोरून एक लोकल येताना दिसली, त्यानंतर ही महिला आपल्या जागेवरून उठली आणि रेल्वे रुळावर उडी घेतली. भरधाव लोकल येत असल्याचे पाहून या तरुणीने प्लॅटफार्मवर पर्स खाली टाकली आणि रुळावर उडी मारली. आपलं डोकं रेल्वे रुळावर ठेवून झोपली. अवघ्या काही सेंकदात फास्ट लोकल तिच्या अंगावर गेली. यात त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.  हा संपूर्ण प्रकार रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या तरुणीची ओळख अद्याप पटू शकली नाही. या तरुणीने आत्महत्या का केली, काय कारण होतं, याचा तपास पोलीस करत आहे.

खासगी कोविड सेंटरमध्ये शिवसेनेच्या माजी शाखाप्रमुखाची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मुंबई लोकलने प्रवास करण्यात मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा म्हणूनच सध्या लोकल सुरू आहे. त्यामुळे विक्रोळी स्थानकावर लोकांची अजिबात गर्दी नव्हती. त्याच दरम्यान, या तरुणीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
Published by:sachin Salve
First published: