मुलीचा पाठलाग करणं ठाण्यातल्या रोड रोमिओला पडलं महागात; तुरुंगात 22 महिने खडी फोडायची शिक्षा

मुलीचा पाठलाग करणं ठाण्यातल्या रोड रोमिओला पडलं महागात; तुरुंगात 22 महिने खडी फोडायची शिक्षा

Crime in Thane: एका मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला विशेष न्यायालयाने 22 महिन्यांची कठोर सजा सुनावली आहे. साडेचार वर्षांनंतर याप्रकरणी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

  • Share this:

ठाणे, 27 फेब्रुवारी: आपल्या आजूबाजूला किंवा शाळा, महाविद्यालयासमोर एखाद्या मुलीचा पाठलाग करणाऱ्या मजनुंची राज्यात कमी नाही. अशाच प्रकारचं चित्र देशात अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. पण अशा प्रकारे मुलींचा पाठलाग करणं किती महागात पडू शकतं याचा प्रत्यय नुकताच आला आहे. एका मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला विशेष न्यायालयाने 22 महिन्यांची कठोर सजा सुनावली आहे. साडेचार वर्षांनंतर याप्रकरणी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मुंबईजवळील ठाणे येथील आहे. येथील एक 24 वर्षीय तरुण पीडित मुलीचा सतत पाठलाग करण्याच्या आरोपात दोषी आढळला आहे. याप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपीला 22 महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाची आता सोशल मीडित जोरात चर्चा सुरू असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरू केल्या आहेत.

ठाण्याच्या विशेष न्यायालयाने दोषी सुनिल कुमार याला भारतीय दंड संहितेच्या 354 D (पाठलाग करणे) आणि लैंगिक छळासाठी पोक्सो (POCSO) कलमांतरर्गत अपराधी ठरवलं आहे. याप्रकरणी आरोपीला  22 महिन्यांचा कठोर कारावास सुनावला आहे. तसेच आरोपी सुनिल कुमार दुखीलाल जायसवाल याच्याकडून 500 रुपयांचा दंडही आकारला आहे. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर आर वैष्णव यांनी दिला आहे.

हे ही वाचा- Online Game Taskसाठी मुलाचा महिलेवर जीवघेणा हल्ला, चॅटमुळं समोर आलं प्रकरण

याप्रकरणी पीडितेची बाजू मांडणाऱ्या वकिल उज्ज्वला मोहोळकर यांनी सांगितलं की, दोषी सुनिल कुमार पीडित मुलाचा सतत पाठलाग करत होता. त्यामुळे पीडितेच्या वडीलांनी 2016 साली दोषी सुनिल कुमारच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा सखोल तपासणी केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे ठाण्याच्या विशेष न्यायालयाने मिळालेल्या सर्व पुराव्यांच्या आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे.

Published by: News18 Desk
First published: February 27, 2021, 7:05 PM IST

ताज्या बातम्या