• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Mumbai: समोरासमोर येताच एकमेकांना भिडले; चाकूने सपासप वार करत एकाची हत्या

Mumbai: समोरासमोर येताच एकमेकांना भिडले; चाकूने सपासप वार करत एकाची हत्या

Murder in Mumbai: गुरुवारी मध्यरात्री मुंबईतील चेंबूर परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने भोकसून (stabbed with knife) हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 30 ऑक्टोबर: गुरुवारी मध्यरात्री मुंबईतील (Mumbai) चेंबूर (Chembur) परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने भोकसून (Stabbed with knife) हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून आरोपीने मृत तरुणाच्या छातीवर आणि पोटात चाकूने जवळपास पाच वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की, संबंधित तरुणाचा अवघ्या काही क्षणातच तडफडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक (Accused arrested) केली असून घटनेचा पुढील केला जात आहे. मध्यरात्री घडलेल्या हत्येची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण झालं होतं. वसीम अब्बास मुखरी असं हत्या झालेल्या 32 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. तो चेंबूर येथील रमाबाई कॉलनी परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वसीम हा गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शौचालयात जात होता. दरम्यान भालेराव चाळ येथून आरोपी सुमित ओव्हाळ विरुद्ध दिशेनं येत होता. दोघंही एकमेकांसमोर येताच दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. किरकोळ कारणावरून सुरू झालेला दोघांतील हा वाद वाढून विकोपाला गेला. हेही वाचा-फेसबुकवरील मैत्री जीवावर बेतली; तरुणाच्या आत्महत्येनं झाला लव्ह स्टोरी The End यामुळे संतापलेल्या आरोपी सुमित ओव्हाळ याने स्वत: जवळील चाकूने वसीमवर चाकूने सपासप वार केले. आरोपी सुमित याने वसीमच्या छातीत आणि पोटावर धारदार चाकुने पाच वार केले आहेत. या हल्ल्यात वसीम घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यावेळी आसपासच्या लोकांनी वसीमला तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण येथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं. हेही वाचा-मध्यरात्री मुंबईत रंगला सायको किलरचा थरार; 15मिनिटात दगडाने ठेचून दोघांना संपवलं या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुमित ओव्हाळ विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नेमक्या कोणत्या कारणातून दोघांत वाद झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. टिळकनगर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपी सुमित हा चेंबूर येथील रमाबाई कॉलनीतील रहिवासी असून यापूर्वी देखील त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या घटनेचा सविस्तर तपास टिळक नगर पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: