मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत पोटच्या लेकाकडून आईवर अमानुष अत्याचार; सख्ख्या भावानं दिला भयंकर मृत्यू

मुंबईत पोटच्या लेकाकडून आईवर अमानुष अत्याचार; सख्ख्या भावानं दिला भयंकर मृत्यू

Murder in Mumbai: मुंबईतील वाकोला परिसरात एका तरुणानं आपल्या सख्ख्या भावाची चाकू भोकसून निर्घृण हत्या केली आहे.

Murder in Mumbai: मुंबईतील वाकोला परिसरात एका तरुणानं आपल्या सख्ख्या भावाची चाकू भोकसून निर्घृण हत्या केली आहे.

Murder in Mumbai: मुंबईतील वाकोला परिसरात एका तरुणानं आपल्या सख्ख्या भावाची चाकू भोकसून निर्घृण हत्या केली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 09 ऑक्टोबर: मुंबईतील वाकोला परिसरात एका तरुणानं आपल्या सख्ख्या भावाची चाकू भोकसून (Stabbed with knife) निर्घृण हत्या (Young man killed brother) केली आहे. मृत भावानं दारू पिऊन आईला केलेली मारहाण (Son beat mother) न बघवल्यानं तरुणानं आपल्या सख्ख्या भावाला भयंकर मृत्यू दिला आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी भावाला अटक (Accused brother arrest) करण्यात आली आहे. आरोपी भावानं हत्येची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास वाकोला पोलीस करत आहेत. हत्या झालेल्या भावाचं नाव रमेश असून पोलिसांनी आरोपी भाऊ सुरेंद्र याला अटक केली आहे. दोघंही सख्खे भाऊ असून ते वाकोल्यातील डिमेलो कंपाऊंड परिसरातील रहिवासी आहेत. तळ मजल्यावर रमेश आणि त्याची आई तर पहिल्या मजल्यावर आरोपी सुरेंद्र हा त्याच्या दोन मुलांसोबत वास्तव्याला होता. मृत रमेशला दारूचं प्रचंड व्यसन होतं. दारुच्या आहारी गेलेला रमेश दारू पिऊन घरी आल्यानंतर अगदी छोट्या छोट्या कारणावरून वाद घालायचा. तसेच तो आपल्या जन्मदात्या आईवर अमानुष अत्याचार करत मारहाण करायचा. हेही वाचा-पोलीस ठाण्यातही महिला असुरक्षित; पगार देण्याच्या बहाण्यानं बोलवलं अन्..., मृत रमेशच्या रोजच्या त्रासाला सुरेंद्र कंटाळला होता. अनेकदा समज देऊनही त्याच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. दरम्यान गुरुवारी रात्री रमेश नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता. यावेळीही त्यानं आपल्या आईला मारहाण केली. तसेच त्याने सुरेंद्रशीही वाद घातला. आईला दररोज होणारी मारहाण न बघवल्यानं रागाच्या भरात सुरेंद्रनं रमेशची चाकू भोकसून हत्या केली आहे. हेही वाचा-मण्यार चावल्याने भावाचा मृत्यू; अंत्यविधीसाठी आलेल्या बहिणीलाही त्याच सापाचा दंश चाकू भोकसल्यानंतर झालेला आरडाओरडा ऐकून परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा रमेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर शेजाऱ्यांनी रमेशला तातडीनं सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी रमेशला मृत घोषित केलं आहे. या घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी भावाला अटक केली आहे. आरोपी भावानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आज सुरेंद्रला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Mumbai, Murder

पुढील बातम्या