Home /News /mumbai /

मुंबईत महिला वकिलासोबत ATMमध्ये तरुणाचं विकृत कृत्य; नंतर हातातील पैसे घेऊन काढला पळ

मुंबईत महिला वकिलासोबत ATMमध्ये तरुणाचं विकृत कृत्य; नंतर हातातील पैसे घेऊन काढला पळ

Crime in Mumbai: मुंबईच्या अंधेरी परिसरातील एका एमटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिला वकिलासोबत विचित्र घटना घडली आहे. एटीएममधून पैसे काढत असता, एका तरुणाने तिच्यासोबत अश्लील कृत्य (Sexual molestation) केलं आहे.

    मुंबई, 22 जानेवारी: मुंबईच्या अंधेरी परिसरातील एका एमटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिला वकिलासोबत विचित्र घटना घडली आहे. एटीएममधून पैसे काढत असता, एका तरुणाने तिच्यासोबत अश्लील कृत्य (Sexual molestation) केलं आहे. त्यानंतर आरोपीनं पीडित महिलेच्या हातातील पैसे घेऊन पळ (Snatch money and run away) काढला आहे. या प्रकरणी पीडित महिला वकिलाने अंधेरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या (Accused arrested) आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा बारकाईने तपास करत आरोपीचा शोध लावला आहे. अविनाश कासार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो पालघर येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी 19 जानेवारी रोजी 26 वर्षीय पीडित महिला वकील पैसे काढण्यासाठी अंधेरीतील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये गेली होती. यावेळी आरोपी अविनाश याठिकाणी आला, त्याने पीडित महिलेचा विनयभंग करत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीनं पीडितेच्या हातातील पैसे घेऊन पळ काढला आहे. ही घटना 19 जानेवारी रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली आहे. हेही वाचा-पैशांसाठी माणुसकी विसरला सावकार, नवजात बाळाला आईच्या कुशीतून नेलं हिसकावून पोलीस पथकाने ज्याठिकाणी घटना घडली होती, त्या ठिकाणापासून सीसीटीव्हीच्या आधारे माग काढला. पोलिसांनी आरोपीनं पलायन केलेल्या सर्व मार्गाच्या आधारे शोध घेतला. संदिग्ध आरोपी कोणत्या स्टेशनवरून लोकलमध्ये बसला आणि कुठे उतरला, कोणती ट्रेन बदलली, याची सर्व माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोळा करत, त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचले. पण आरोपी तेथून गायब झाला होता. याठिकाणी पोलिसांना आरोपीचा मोबाईल नंबर मिळाला. हेही वाचा-पुणे: TVचा आवाज वाढवून अल्पवयीन मुलीला बनवलं वासनेचा शिकार, 31वर्षीय नराधम गजाआड संबंधित मोबाइल नंबरच्या आधारे पोलिसांनी आरोपीला लोकेशन शोधून काढलं. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अंधेरी एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीची चौकशी केली असता, त्याने पीडित महिलेची छेड काढली असल्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास अंधेरी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai

    पुढील बातम्या