Home /News /mumbai /

Video..! दहिसरमध्ये तडीपार तरुणाचा भरदिवसा तमाशा, डझनभर गुंडांसोबत घरात घुसून मारहाण; दोन जण जखमी

Video..! दहिसरमध्ये तडीपार तरुणाचा भरदिवसा तमाशा, डझनभर गुंडांसोबत घरात घुसून मारहाण; दोन जण जखमी

मुंबईतल्या (Mumbai) दहिसर (Dahisar) येथून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. शुक्रवारी संध्याकाळी तडीपार तरुणानं आपल्या डझनभर गुंडांसोबत (Goons)परिसरात धिंगाणा घातला आहे.

    मुंबई, 15 जानेवारी: मुंबईतल्या (Mumbai) दहिसर (Dahisar) येथून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. शुक्रवारी संध्याकाळी तडीपार तरुणानं आपल्या डझनभर गुंडांसोबत (Goons)परिसरात धिंगाणा घातला आहे. दहिसर पूर्व वीर संभाजी नगर भागात ही घटना घडली आहे. आरोपी तरुण दहिसर पोलीस स्टेशनमधून तडीपार झाला आहे. आरोपी तरुणानं आपल्या गुंडांच्या साथीनं संजय सिंह नावाच्या व्यक्तीच्या घरी जबरदस्तीनं घुसला. एवढंच करुन तो थांबला नाही तर त्यांना मारहाण केली तसंच तिथे राहणाऱ्या एका तरुणाच्या पोटात धारदार शस्त्र घुसवलं. जखमी तरुणाला गंभीर अवस्थेत दहिसर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याला तेथून नायर रुग्णालयात पाठवण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. हेही वाचा-  हृदयद्रावक! हातावर पोट असणाऱ्या दाम्पत्यानं गमावलं पोटचं लेकरू, दोन वेळच्या अन्नासाठी झगडताना झाला मृत्यू  या व्हिडिओमध्ये डझनभर गुंड घराची तोडफोड करताना आणि मारहाण करताना दिसत आहेत. मारहाणीदरम्यान आरोपींच्या हातात मोठी कात्री आहे, ज्याने त्यांनी हल्ला केला आहे. दहिसर पोलिसांनी सांगितले की, मकर संक्रांतीची सुट्टी होती. नशेमध्ये काही लोकांनी मारहाण केली. त्यात दोघे जण जखमी झाले आहेत. सध्या दहिसर पोलीस तक्रार नोंदवली असून दोघांना ताब्यात घेतलं आहे. अधिक तपास करत आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Mumbai

    पुढील बातम्या