एकाच मांडवात दोन वधुंशी विवाह थाटणार हा पठ्ठा, अनोख्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

एकाच मंडपात एक तरुण चक्क दोन वधुंशी लग्न केल्याचे ऐकल्यावर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु हो पालघर जिल्ह्यतील तलासरी तालुक्यतील वसा सुतारपाडा येथे राहणाऱ्या संजय धाडगा याच एकाच मंडपात दोन वधुशी लग्न 22 तारखेला दुपारी 3 वाजता होणार आहे

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 05:52 PM IST

एकाच मांडवात दोन वधुंशी विवाह थाटणार हा पठ्ठा, अनोख्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

पालघर, 11 एप्रिल- एकाच मंडपात एक तरुण चक्क दोन वधुंशी लग्न केल्याचे ऐकल्यावर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु हो पालघर जिल्ह्यतील तलासरी तालुक्यतील वसा सुतारपाडा येथे राहणाऱ्या संजय धाडगा याच एकाच मंडपात दोन वधुशी लग्न 22 तारखेला दुपारी 3 वाजता होणार आहे. पेशाने रिक्षाचालक असलेल्या संजय आपल्या दोन जीवनसंगिणीसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. 22 तारखेचा लग्नसोहळा एकाच मंडपात पार पडणार असून त्यासाठी घरासमोरील आवारात तयारी सुरू झालीय.

ह्याच झालं असं की, संजय धाडगा आणि बेबी व रीना या दोन वधूची नावे असलेली लग्नासाठी छापलेली लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर एकाच मंडपात दोन वधुशी होणाऱ्या अशा अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या संजयने रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह सुरू केला. 10 वर्षांपूर्वी त्याचे बेबी नावाच्या मुलीशी सूत जुळले. नंतर हे दोघ एकत्र घरात राहून संसाराचा गाडा हाकू लागले. त्यातच रिक्षाचालक म्हणून कार्यरत असतानाच 8 वर्षांपूर्वी रिना नावाच्या मुलींवर प्रेम जुळेल. बेबी आणि रीना ह्या दोघी संजयबरोबर एकाच घरात राजीखुशी लग्न न करताच संसारात रममाण झाल्या. सध्या बेबीला एक मुलगा एक मुलगी तर रिनाला एक मुलगी आहे. तिघे मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

आदिवासी समाजात ऐपत नसल्याने अशी अनेक कुटुंब उतारवयात ही सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करतात किंवा मुलंबाळं झाल्यावर ही लग्न लावत असतात. लग्नात मांसाहारसह मद्यपानावर खर्च करावा लागतो. आदिवासी समाजात लग्न खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे आदिवासी ग्रामीण भागात अनेक वधुवर मुलंबाळं झाल्यावरही लग्न करतात.


VIDEO: अमोल कोल्हे यांचा हमीभाव मिळवून देणारा 'शेतकरी अजेंडा'

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...