पावसामुळे बंद पडली ट्रेन... रेल्वे रुळावरुन पाया जाताना नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू

मुसळधार पावसात लोकल ट्रेन बंद पडल्याने रेल्वे रूळावरून चालत जाताना एका तरुणाचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2019 04:31 PM IST

पावसामुळे बंद पडली ट्रेन... रेल्वे रुळावरुन पाया जाताना नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू

विजय देसाई, (प्रतिनिधी)

वसई, 7 सप्टेंबर: वसई-विरारमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने एका तरुणाचा बळी घेतला आहे. मुसळधार पावसात लोकल ट्रेन बंद पडल्याने रेल्वे रूळावरून चालत जाताना एका तरुणाचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. मनीष सिंह (वय-36) असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह वसंत नगरी येथील नाल्यात शुक्रवारी सापडला.

मिळालेली माहिती अशी की, मनीष सिंह हा तरुण बुधवारपासून बेपत्ता होता. वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टरमध्ये मनीष सिंहची नोंद करण्यात आली होती. मात्र, वसंत नगरीतील नाल्यात त्याचा मृतदेह सापडला आहे. लोकल ट्रेन बंद पडल्याने मनीष सिंह हा वसई रेल्वे स्टेशनहून नालासोपारा स्टेशनकडे रेल्वे रुळावरून जात होता. नालासोपाऱ्यात पाणी असल्याने ट्रेन बंद असून मी चालत येत असल्याचे मनीषने त्याच्या पत्नीला फोन करून सांगितले होते. अर्ध्या तासानंतर त्याचा फोन स्वीच ऑफ झाला. दरम्यान, त्याचा पाय घसरून तो नाल्यात पडला. नाल्यात त्याचा बुडून मृत्यू झाला.

मनीष सिंह नालासोपारामधील (पूर्वे) कडील अलकापुरीमध्ये आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. मनीष मुंबईतील एअरपोर्टजवळ सहारा पेट्रोल पंपावर नोकरीला होता. ड्युटी करून येताना त्याच्यावर मृत्यू ओढवला. मनीषचा मृतदेह वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला.

मुंबईसह उपनगरात 'कोसळधार', साचले पाणी, या जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट'

Loading...

मुंबईसह उपनगरात शनिवारी सकाळपासून मुरळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली. दुपारी अडीच वाजेनंतर पावसाचा जोर आणखी वाढला आहे. पुढील काही तास असाच पाऊस सुरू राहीला तर उपनगरीय वाहतूक तसेच रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, गोरेगाव परिसरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे.

ठाणे जिल्हयातही पाऊस..

ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यात मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, कोलशेत, ब्रह्मान्ड, घोडबंदर रोड परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. या बरोबरत भाईंदर, वसई, विरार पट्ट्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे.

नाशिकमध्ये बिझनेस बँक इमारतीत अग्नितांडव! आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2019 04:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...