मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मैत्रिणींसमोर 'चरसी' म्हटल्यानं कॉलेज विद्यार्थ्याला मारहाण; मुंबईतील तरुणानं संपवलं जीवन

मैत्रिणींसमोर 'चरसी' म्हटल्यानं कॉलेज विद्यार्थ्याला मारहाण; मुंबईतील तरुणानं संपवलं जीवन

यातील मृत महिला हरविल्याची फिर्याद तिच्या पतीने 1 मे रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात नोंदविली होती अशी माहिती समोर आली आहे.

यातील मृत महिला हरविल्याची फिर्याद तिच्या पतीने 1 मे रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात नोंदविली होती अशी माहिती समोर आली आहे.

Crime in Mumbai: 'चरसी' म्हटल्याच्या कारणातून दोन जणांनी एका महाविद्यालयीन तरुणाला मारहाण (2 young men beat college student) केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी मुंबई, 27 नोव्हेंबर: 'चरसी' म्हटल्याच्या कारणातून दोन जणांनी एका महाविद्यालयीन तरुणाला मारहाण (2 young men beat college student) केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. पीडित तरुणानं आरोपींच्या मैत्रिणींसमोर त्यांना 'चरसी' म्हटलं (Called charasi in front of female friend) होतं. त्यामुळे संतापलेल्या दोन्ही तरुणांनी चरसी म्हणणाऱ्या तरुणाला महाविद्यालयाच्या गेटवरच बेदम मारहाण केली आहे. आरोपी तरुण आपल्याला पुन्हा मारहाण करतील या भीतीतून संबंधित तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Young man commits suicide) केली आहे.

विशेष म्हणजे, संबंधित तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या एका मित्राला इन्स्टाग्रावरून सांगितला आहे. या प्रकरणी न्हावा शेवा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोन्ही बारावीतील तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास न्हावा शेवा पोलीस करत आहेत. संबंधित मृत तरुण नवी मुंबईतील उलवे भागातील रहिवाशी असून तो सीवूड्स येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होता.

हेही वाचा-पतीच्या निधनानंतर FBवरील तरुणानं दाखवली सुखी संसाराची स्वप्न पण..; बीडमधील घटना

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, त्याने पुन्हा महाविद्यालयात  जायला सुरुवात केली होती. 12 नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात गेला होता. यावेळी त्याने संबंधित दोघे ‘चरसी’ असल्याचं वक्तव्य वर्गातील दोघी मैत्रिणींसमोर केलं होतं. वर्गातील मुलींसमोर आपल्याबद्दल वाईट बोलल्याचं आरोपी तरुणांना कळाल्यानंतर, त्यांना राग अनावर झाला. त्यामुळे दोन्ही आरोपींनी संबंधित तरुणाला कॉलेजच्या गेटवर अडवलं, आणि चरसी म्हटल्याबद्दलचा जाब विचारला.

हेही वाचा-औरंगाबादेत दोन गटांत तुंबळ हाणामारी, परिसरात तणावाचे वातावरण, VIDEO Viral

यानंतर बाचाबाची झाल्यानंतर, दोन्ही तरुणांनी चरसी म्हणणाऱ्या तरुणाला गेटवरच बेदम मारहाण केली. या घटनेनंतर पीडित तरुण आपल्या घरी गेला. त्याने इन्स्टाग्रामवरून सर्व प्रकार आपल्या एका मित्राला सांगितला. यानंतर राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai