Home /News /mumbai /

VIDEO: हात जोडून विनवणी करूनही मारत राहिला जमाव; ठाण्यात मध्यरात्री तरुण-तरुणीला बेल्टनं बेदम मारहाण

VIDEO: हात जोडून विनवणी करूनही मारत राहिला जमाव; ठाण्यात मध्यरात्री तरुण-तरुणीला बेल्टनं बेदम मारहाण

Crime in Thane: काल रात्री उशीरा कल्याण येथील काळसेवाडी भागात एका तरुणाला आणि तरुणीला बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी संबंधित तरुणीचे केस पकडून तिलाही बुक्क्यांनी मारहाण केली आहे.

    कल्याण, 03 जुलै: काल रात्री उशीरा कल्याण येथील काळसेवाडी भागात एका दुचाकीनं ऑटो रिक्षाला किरकोळ धडक मारली (Accident) होती. या कारणातून काही स्थानिक लोकांनी दुचाकीवरील एका तरुणाला आणि तरुणीला बेदम मारहाण (Beating) केली आहे. आरोपींनी संबंधित तरुणीचे केस पकडून तिलाही बुक्क्यांनी मारहाण केली आहे. दरम्यान तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीनं या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यानं या पोस्टमध्ये ठाणे पोलिसांना देखील टॅग केलं आहे. यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. खरंतर काल रात्री सव्वा बाराच्या सुमारास एक तरुण आणि तरुणी दुचाकीनं जात होतं. दरम्यान वाटेत त्यांच्या दुचाकीनं एका रिक्षाला किरकोळ धडक मारली. यावरून संबंधित तरुण आणि रिक्षा चालकात बाचाबाची झाली. यानंतर रिक्षा चालकानं आसपासच्या लोकांना गोळा करून तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावानं तरुणाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत बुक्क्यांनी आणि बेल्टनं मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या मित्राला होणारी मारहाण पाहुन तरुणीनं हात जोडून मित्राला न मारण्याची विनंती केली. तरीही आरोपी तरुण मारतच राहिले. तर काही लोकांनी या मुलासोबत संबंधित मुलीलाही केस पकडून मारहाण केली आहे. दरम्यान एका व्यक्तीनं मध्यस्थी करत संतप्त जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाही बेल्टचे फटके मारले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमधून संतप्त भावना उमटत आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणाच्या ट्वीटची ठाणे पोलिसांनी त्वरीत दखल घेत, कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं. पण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, पोलिसांनी सांगितलं की संबंधित तरुण तरुणीला पोलीस ठाण्यात आणलं आहे. पण अद्याप कोणतीही तक्रार नोंदलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Thane

    पुढील बातम्या