व्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या

व्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या

वारंवार चौकशीमुळे आणि बॉयफ्रेंडला गमावल्याच्या नैराश्यात येत रुपमने आत्महत्या केली असल्याचा आरोपी तिच्या कुटुंबीयांनी लगावला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : विक्रोळीमधील पार्क साईट परिसरात व्हॅलेंटाईन डे साजराकरून आल्यानंतर एक 16 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर येत आहे. बॉयफ्रेंडच्या अकाली मृत्यूमुळे तरुणीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

रुपम यादव असं आत्महत्या करण्याऱ्या तरुणीचं नाव आहे. ती डिग्रीच्या पहिल्या वर्गात शिकत होती. रुपमची एका मुलाशी मैत्री होती. त्याने भांडूपमध्ये त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणात भांडूप पोलिसांनी वारंवार रुपमची चौकशी केली. त्यामुळे ती व्यथित होती.

वारंवार चौकशीमुळे आणि बॉयफ्रेंडला गमावल्याच्या नैराश्यात येत रुपमने आत्महत्या केली असल्याचा आरोपी तिच्या कुटुंबीयांनी लगावला आहे. बॉयफ्रेंडच्या आत्महत्येमुळे रुपम दुखी होती. ती सारखी एकटी राहायची. यावर तिला तिच्या भावंडांनी खूप समजवलं. पण ती त्याला विसरू शकत नव्हती.

हेही वाचा: मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून आईवर राग, 7 वीच्या मुलीची आत्महत्या

त्यात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याची उणीव तिला जाणवत होती. त्याच नैराश्यातून रुपमने आत्महत्या केली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, तिला वेगळ्या गोष्टीमध्ये रमवण्यासाठी कुटुंबीयांनी रुपमला व्हॅलेंटाईनला फिरण्यासाठी नेलं. पण तिच्या जुन्या गोष्टी ती विसरू शकली नाही आणि तिने आत्महत्या केली असं जबाब रुपमच्या कुटुंबीयांकडून नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांना रुपमच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

3 वर्षांच्या चिमुरड्याचा वडिलाना अखेरचा प्रणाम, गावकऱ्यांचे डोळे पाणावले VIDEO

First published: February 16, 2019, 8:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading