धावत्या रिक्षातून तरुणीने मारली उडी, रिक्षाचालक करत होता अश्लिल चाळे!

धावत्या रिक्षातून तरुणीने मारली उडी, रिक्षाचालक करत होता अश्लिल चाळे!

रिक्षाचालक अश्लील चाळे करत होता आणि चुकीच्या दिशेनं रिक्षा नेत होता.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी : मुंबईतील  मुलुंड भागात एका 20 वर्षीय तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  रिक्षाचालक अश्लील चाळे करत होता आणि चुकीच्या दिशेनं रिक्षा नेत होता, समयसूचकता दाखवत या मुलीने उडी मारून आपला जीव वाचवला.

ही गुरुवारी रात्री घडली आहे. ही वीस वर्षीय तरुणी मुलुंडच्या संभाजीनगर परिसरात राहते. गुरुवारी रात्री ती मुलुंड कॉलनी परिसरात राहत असलेल्या तिच्या भावाकडे कामानिमित्त गेली होती. रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान तरुणी त्या परिसरातून रिक्षाने तिच्या घराकडे येत होती. परंतु, ती ज्या रिक्षाने प्रवास करीत होती त्या रिक्षाचा चालक हा वारंवार रिक्षाच्या आरश्यातून या तरुणीकडे अश्लील नजरेनं पाहत होता. त्यातच तरुणीने मुलुंड च्या पंचरत्न मंदिराकडे रिक्षा चालकाला रिक्षा नेण्यास सांगितले असता चालकाने रिक्षा दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला.

रिक्षाचालक तिच्याकडे पाहून अश्लिल चाळे करत होता, हे लक्षात येताच तिने समय सूचकता दाखवत गतिरोधक आल्यावर रिक्षाचा वेग कमी झाला आणि याचा फायदा घेऊन चालू रिक्षातून उडी मारली. या वेळी या तरुणीच्या डोक्याला दुखापत देखील झाली.

रिक्षातून पडल्यानंतर काही  स्थानिकांनी या तरुणीला पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारास दाखल केलं. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. या  तरुणीने मुलूंड पोलीस ठाण्यात या रिक्षा चालकाच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी त्या अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुलुंड पोलीस या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.

सिलेंडर डोक्यात घालून पतीनं केली पत्नीची हत्या

दरम्यान,  रिकामी गॅस सिलेंडर डोक्यात घालून पतीनं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडली. कातोडी पाडा इथं कदम कुटुंबीयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. अंजना असं या मृत महिलेचं नाव आहे.

घाटकोपरच्या कातोडी पाडा येथे कदम कुटुंबीय राहतात. प्रदीप कदम याचे त्याची पत्नी अंजनासोबत गेल्या काही दिवसांपासून वाद होत होते.13 फेब्रुवारीला घरातील सर्वजण सर्व झोपले असताना आरोपी प्रदीप कदम याने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात रिकामे सिलेंडर घातले आणि जखमी अवस्थेत अंजनाला सोडून त्याने थेट घाटकोपर पोलीस स्टेशन गाठलं आणि आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसां दिली.

जखमी अंजनाला पोलिसानी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी  महिलेला तपासून  मयत घोषित केलं. सदर गुन्ह्याबाबत आरोपी प्रदीप वामनला आपल्या पत्नीचा हत्येबाबत घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. तर पुढील तपास घाटकोपर पोलीस ठाणे करीत आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कुंडलिक निगडे यांनी दिली.

First published: February 14, 2020, 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading