• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; तरुण नगरसेवकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; तरुण नगरसेवकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

Car Accident: काल रात्री उशिरा कल्याण -नगर महामार्गावर (Kalyan Nagar Highway) एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात उल्हासनगर महापालिकेतील (Ulhasnagar Municipal Corporation) एका तरुण नगरसेवकाचा जागीच मृत्यू (Corporator death)झाला आहे.

  • Share this:
उल्हासनगर, 13 नोव्हेंबर: काल रात्री उशिरा कल्याण -नगर महामार्गावर (Kalyan Nagar Highway) एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात उल्हासनगर महापालिकेतील (Ulhasnagar Municipal Corporation) एका तरुण नगरसेवकाचा जागीच मृत्यू (Corporator death)झाला आहे. तर कारमधील अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित तिघांवर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत नगरसेवक आपल्या मित्रांसमवेत टिटवाळा याठिकाणी जात होते. दरम्यान हा दुर्दैवी अपघात झाला आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर रुग्णालयात अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मृत अजित उर्फ पप्पू गुप्ता हे उल्हासनगर महापालिकेतील नगरसेवक आणि पाणी पुरवठा सभापती होते. कल्याण-नगर महामार्गावर रात्री उशिरा झालेल्या कार अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हेही वाचा-बीड हादरलं! अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, पोलिसानंही केलं लैंगिक शोषण तसेच त्यांच्यासोबत कारमध्ये असणाऱ्या अन्य तिघे जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात घडल्यानंतर, स्थानिक नागरिकांनी सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेलं. मात्र याठिकाणी उपचारापूर्वीच डॉक्टरांनी नगरसेवक अजित गुप्ता यांना मृत घोषित केलं आहे. या घटनेनं मित्र परिवाराला धक्का बसला असून नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा-औरंगाबाद: बलात्कार पीडितेला मदतीच्या बहाण्यानं लुटलं; 20 लाखांचा घातला गंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नगरसेवक अजित गुप्ता आपल्या काही मित्रांसोबत उल्हासनगरहून टिटवाळा याठिकाणी जात होते. दरम्यान वरपजवळील पाचवा मैल रस्त्यावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. गुप्ता यांच्या कारला दुसऱ्या एका वाहनानं जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, या घटनेत गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुप्ता हे साई पक्षाचे नगरसेवक होते. गुप्ता यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णलयात मोठी गर्दी केली होती.
Published by:News18 Desk
First published: