मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

धक्कादायक! मुंबई लोकलच्या दारात तरुणांचे स्टंट्स, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

धक्कादायक! मुंबई लोकलच्या दारात तरुणांचे स्टंट्स, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

लोकलमध्ये स्टंट करणं हा अनेक तरुणांना अभिमानाचा विषय वाटतो. आता पुन्हा असाच अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.

लोकलमध्ये स्टंट करणं हा अनेक तरुणांना अभिमानाचा विषय वाटतो. आता पुन्हा असाच अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.

लोकलमध्ये स्टंट करणं हा अनेक तरुणांना अभिमानाचा विषय वाटतो. आता पुन्हा असाच अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 9 फेब्रुवारी : मुंबईची लोकल (Mumbai local) म्हणजे या शहराची लाईफलाईन. रोज असंख्य लोक लोकलनं प्रवास करतात. मुंबईत लोकलला खरोखर पर्याय नाही. मात्र काही तरुण लोकलचं महत्त्व आणि गरज न ओळखता तिचा वापर भलत्याच गोष्टीसाठी करत असतात. ही गोष्ट म्हणजे स्टंटबाजी. हे स्टंटबाज तरुण (youth doing stunts) आजवर अनेकदा लोकल कर्मचाऱ्यांनी (local employees) हटकलं, समज दिली तरी शहाणे होताना दिसत नाहीत. अनेकांचे यातून अपघात (accidents) घडतात. त्याबाबतचे व्हिडिओही आजवर अनेकदा व्हायरल (viral) झाले आहेत. आता तर जवळपास 10 महिन्यांनी मुंबई लोकल सुरू झाली आहे. आता नुकतंच पुन्हा एकदा मुंबई लोकलमध्ये जीवघेणे स्टंट्स करताना काही मुलं दिसली आहेत. याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ (video) सेंट्रल रेल्वेच्या (central railway) दादर ते सायन या स्टेशन्सच्या (Dadar to Sion station) दरम्यानचा असल्याचं सांगितलं जात आहे. काही तरुण चालत्या लोकलमध्ये (running local) जीवाची पर्वा न करता चित्रविचित्र स्टंट करत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यावर रेल्वेनं या प्रकरणाची तातडीनं तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. 7 फेब्रुवारी 2021 च्या सकाळी 9.30 आणि 10 वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे. अंबरनाथहून सीएसएमटीला जाणारी लोकल ट्रेन सायनहून निघाल्यावर लगोलग दारात उभे असलेले काही तरुण धोकादायक स्टंटबाजी करायला लागतात. लोकल भरधाव वेगात असताना कुणी जवळच्या खांबांवर हात मारतं तर कुणी दुसऱ्या दिशेनं येणाऱ्या लोकलच्या चालकाच्या समोर असलेल्या काचेवर हात मारतं. हे स्टंट करताना हात सुटला तर परिणाम काय होईल या विचारानंच अंगावर काटा येतो. व्हिडिओ समोर आल्यावर मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश देत स्टंट करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या स्टंट करणाऱ्या युवकांचा शोध घेतला जात आहे.
First published:

Tags: Mumbai, Mumbai local, Railway accident, Stunt video

पुढील बातम्या