नवी मुंबई विद्युत वाहिनीचा स्फोट, रस्त्याने जाणारा तरुण होरपळला

नवी मुंबई विद्युत वाहिनीचा स्फोट, रस्त्याने जाणारा तरुण होरपळला

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिनीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात एक तरुण होरपळून गंभीर जखमी झाला. शुभम सोनी असे या तरुणाचे नाव आहे.

  • Share this:

नवी मुंबई,23 सप्टेंबर: नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिनीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात एक तरुण होरपळून गंभीर जखमी झाला. शुभम सोनी असे या तरुणाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, कोपरखैरणे सेक्टर 5 मध्ये सोमवारी ही घटना घडली. शुभम रस्त्याने जात असताना विद्युत वाहिनीचा अचानक स्फोट झाला. शुभमच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. या आगीत शुभम होरपळला. शुभमला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नवी मुंबईतील विद्युत वाहिनीचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. या आधीही विद्युत वाहिनीचा शॉक लागण्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (22 सप्टेंबर) समोर आली होती. सिद्धाराम सूर्यकांत कपले (वय-25) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथे शनिवारी सकाळी 7 च्या सुमारास मातृलिंग गणपती रोडवरील डीपी येथे ही घटना घडली. सिद्धाराम कपले हा डीपीमध्ये फ्यूज टाकण्यासाठी गेला होता. डीपीमध्ये फ्यूज बसवत असताना सिद्धाराम कपले याला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सिद्धापूर गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईत ट्रान्सफॉर्मरमध्ये आग; स्फोटाची भीषणता दाखवणारा CCTV VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: September 23, 2019, 1:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading