धक्कादायक: मुंबईत तरूणावरच गॅंगरेप.. पार्श्वभागात टाकली नारळाची कवटी

धक्कादायक: मुंबईत तरूणावरच गॅंगरेप.. पार्श्वभागात टाकली नारळाची कवटी

जखमी अवस्थेत पीडित तरूण स्वत:हून कोपरखैरणे येथील रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याच्या पार्श्वभागातून कपडा,नारळाची कवटी बाहेर काढले आहे.

  • Share this:

मुंबई,27 सप्टेंबर:नवी मुंबईत एका तरुणावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. नराधम तरूणावर बलात्कार करून थांबले नाहीत तर त्यांनी त्याच्या पार्श्वभागात कापड आणि नारळाची कवटी टाकली. वाशीमधील सागर विहार भागात बुधवारी (25 सप्टेंबर) सायंकाळी ही घटना घडली. आरोपी फरार असून ते नशेखोर गर्दुल्ले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ऑपरेशन करून बाहेर काढले कापड, नारळाची कवटी..

जखमी अवस्थेत पीडित तरूण स्वत:हून कोपरखैरणे येथील रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याच्या पार्श्वभागातून कपडा,नारळाची कवटी बाहेर काढले आहे. तरुणावर वेळेत उपचार झाल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला.

काय आहे प्रकरण...?

पीडित तरुण सागर विहार येथे रस्त्यावर चालत असताना पाच जणांनी त्याला जबरदस्तीने झुडपात नेले. तिथे त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. नराधमांनी त्याला आधी बेदम मारहाणही केली होती. त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता. बलात्कारानंतर नराधमांनी पीडित तरुणाच्या पार्श्वभागात नारळाची कवटी, कापड टाकला. नंतर आरोपी फरार झाले. जखमी आवस्थेत पीडित तरूण स्वत:हून कोपरखैरणे येथील रुग्णालयात दाखल झाला. त्यांनी डॉक्टरांना आपबिती सांगितली. नंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

इंटरव्ह्यूला गेलेल्या MBA तरुणीवर बलात्कार!

दरम्यान, मुंबईत एका MBA तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. मुंबईच्या विलेपार्ले परिसरात तरुणीवर बलात्कार झाला असल्याची माहिती जुहू पोलिसांकडून देण्यात आली. नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर नराधमाने बलात्कार केला. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर जुहू पोलिसांनी आरोपी साहिलसिंग अरोरा याला अटक केली.

पीडित तरुणी मुळची उत्तर प्रदेळची असल्याचे सांगण्यात येत आहे. MBA झाल्यानंतर नोकरीच्या शोधात तरुणी मुंबईत आली होती. तिला एका खासगी कंपनीत नोकरी लागल्यानंतर ती पेईंगगेस्ट म्हणून इथेच राहत होती. पण पगार कमी असल्यामुळे तिला आर्थिक अडचणी येत होत्या. सगळा खर्च सांभाळून तिला मुंबईत राहणे परवडत नव्हते. त्यामुळे ती नव्या नोकरीच्या शोधात होती. चांगली नोकरी मिळावी यासाठी तरुणीने तिच्या सगळ्या मित्रांना सांगून ठेवले होते. ती ऑनलाइनसुद्धा नोकरी शोधत होती. नोकरी मिळाली नाही तर एप्रिल महिन्यात गावी जाणार असल्याचा निर्णयही तिने घेतला होता. तितक्यात जुलै महिन्याच ऑनलाइन नोकरीच्या शोधात आरोपी साहिलसिंग अरोराच्या संपर्कात आली. नोकरीसाठी ती रोज त्याच्याशी बोलायची. त्याने तिला त्याने चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवले होते. अंधेरीमध्ये एका नामांकित बँकेत HR म्हणून नोकरी देतो, असे सांगत त्याने तिला विलेपार्लेच्या किंग्ज इंटरनॅशनल हॉटेलमध्ये तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावले. पीडित तरुणी तिथे जाताच तिची मुलाखत घेण्याऐवजी आरोपीने तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने मोठी हुशारी दाखवून त्याच्या तावडीतून पळ काढला. घरी येऊन तिने सर्व प्रकार तिच्या मैत्रिनींना सांगितला असता त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. तरुणीने जुहू पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपी अरोराला अटक करण्यात आली आहे.

ओव्हरटेक करणं बेतलं जीवावर! ट्रकनं दुचाकीला चिरडलं, दुर्घटनेचा CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 03:34 PM IST

ताज्या बातम्या