खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी, गाडीवरून खाली पडताच कंटेनरने चिरडले

असिम मुंब्रा येथे राहत होता. तो रात्री गाडीत पेट्रोल भरण्याकरता बाहेर गेला होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 07:47 PM IST

खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी, गाडीवरून खाली पडताच कंटेनरने चिरडले

अजित मांढरे,(प्रतिनिधी)

ठाणे,16 ऑक्टोबर: ठाणे जिल्ह्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे आणखी एकाचा बळी गेला आहे. शिळफाटा रोडवर हा अपघात झाला असून एका तरुणाला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. असिम सिद्दीकी (वय-22) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, असिम मुंब्रा येथे राहत होता. तो रात्री गाडीत पेट्रोल भरण्याकरता बाहेर गेला होता. असिम शिळफाटा रोडवरुन आपल्या घरी परतत असताना रात्री 10.30 च्या सुमारास असिमची गाडी रस्त्यावर पडलेल्या खड्डयात आदळली. असिम रस्त्यावर पडला तितक्यात मागून आलेल्या कंटेनरने असिमला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत असिमला जवळच्याच काळसेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून चालकाला आणि कंटेनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र चालकासोबतच ज्या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्यावर खड्डे पडले आणि याच्यामुळे असिमचा जीव गेला आहे. त्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी असिमच्या नातेवाईकांनी केली आहे.

लग्नाच्या खरेदीला जाणाऱ्या डॉक्टर तरुणीच्या अंगावरून गेला ट्रक

खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात भिवंडी-वाडा मार्गावर दोन जणांचा बळी घेतला. यात एका डॉक्टर तरूणीचा समावेश आहे. डॉ. नेहा शेख (वय-23) असे या तरुणीचे नाव आहे. ती लग्नाच्या खरेदीला जात होती. तिची गाडी खड्ड्यात गेली. तोल गेल्याने खाली पडली. मागून आलेल्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. तिचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी खड्डा चुकवणाऱ्या ट्रकने एका 60 वर्षाच्या नागरिकाला उडवले. कुडूस येथे ही घटना घडली. या अपघातात नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. रामप्रसाद गोस्वामी असे त्या नागरिकाचे नाव आहे. रामप्रसाद हे मुसारणे येथील एका कंपनीत वॉचमन म्हणून कार्यरत होते. रस्त्यात खड्डे असल्याने ते चुकवत चालत होते. त्यातच खोल खड्ड्यात गाडी जावू नये म्हणून ट्रक चालकाने ट्रक थोडा बाजूला घेताच त्यातच हा अपघात झाला.

Loading...

एका अन्य घटनेत भरधाव कंटेनरमुळे घोडबंदरवर पुन्हा एक बळी गेला आहे. रात्री सव्वा अकराच्या सुमारास घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथे हा अपघात झाला होता. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. भाईंदर पाडा इथून ही महिला आपल्या पतीसोबत दुचाकीवरुन जात असताना गाडीला अपघात झाला आणि यात महिलेने जागीच आपला जीव गमावला आहे. महिला दुचाकीवरून जात असताना अचानक मागून भरधाव वेगाने एक कंटेनर आला. याच वेळेस गाडीवर बसलेल्या महिलेचा तोल जाऊन ती खाली पडली आणि तिच्या अंगावर कंटेनर गेला. ज्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये महिलेचा पती आणि लहान मुलगी बचावली आहे.

राणे म्हणजे पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचं घणाघाती UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2019 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...