रेल्वेच्या छतावरची स्टंटबाजी भोवली; ओव्हरहेड वायरला चिकटून तरुण गंभीर जखमी

रेल्वेच्या छतावरची स्टंटबाजी भोवली; ओव्हरहेड वायरला चिकटून तरुण गंभीर जखमी

रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना एक तरुण ओव्हरहेड वायरला चिकटून गंभीर झाला आहे.

  • Share this:

21 डिसेंबर : रेल्वेची स्टंटबाजी आणि त्यातून अपघात काही नवीन नाही आहे. रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना एक तरुण ओव्हरहेड वायरला चिकटून गंभीर झाला आहे.टिळकनगर स्टेशन ते चेंबूर स्टेशनच्या दरम्यान सोमवारी ही घटना घडली. या घडनेचा व्हिडिओ आज समोर आला आहे.

आताची तरुणाई मस्ती करण्यासाठी आणि अतिउत्साहात रेल्वेतून अशा स्टंट करतात आणि आपल्या जीवाशी खेळ करून घेतात. असाच स्टंट या तरुणानेही केला आणि आता तो गंभीर जखमी झाला आहे. जेव्हा रेल्वे चेंबूर स्टेशनला आली तेव्हा या युवकाला खाली उतरवण्यात आलं. तोपर्यंत तो विजेच्या जबरदस्त झटक्याने गंभीररित्या भाजला होता. त्यानंतर जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं.

रेल्वेच्या छतावरून प्रवास करुन जीव धोक्यात घालू नका, असं आवाहन वारंवार रेल्वेकडून केलं जातं. मात्र तरीही अनेक तरुण रेल्वेच्या छतावरून प्रवास करतात आणि आपल्या जीवाचा असा खेळ करतात. पण अतिउत्साहाच्या नादात आपण आपला जीव गमावू शकतो. त्यामुळे तुम्हीही जर रेल्वेनं असाच प्रवास करत असाल तर ते तुमच्यावरच बेतेल हे लक्षात असू द्या आणि असा प्रवास करणाऱ्यालाही थांबवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 05:47 PM IST

ताज्या बातम्या