मुंबई पोलिसांचा असा 'ही' कार्यक्रम, ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

मुंबई पोलिसांचा असा 'ही' कार्यक्रम, ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

मुंबईत एकदा का आपली वस्तू चोरीला गेली की ती परत मिळेल याची खात्री नसते. मात्र..

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी :  मुंबईत चोरी-घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दर महिन्याला शेकडो मोबाईलची चोरी मुंबईत होत असते आणि चोरी झाल्यानंतर फार कमी प्रमाणात लोकांना त्यांची वस्तू परत मिळते. मात्र, मुंबई पोलिसांनी दहिसरमध्ये चक्क 'मोबाइल वापसी'चा कार्यक्रमच हाती घेतला आहे.

मुंबईत एकदा का आपली वस्तू चोरीला गेली की ती परत मिळेल  याची खात्री नसते. मात्र, ऑगस्ट महिन्यात रिक्षात विसरलेला मोबाइल देखिल पोलिसांनी परत मिळवून दिला आहे.  मुंबई पोलीस परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांच्या माध्यमातून हद्दीमध्ये चोरीला गेलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर वस्तू संबंधीत व्यक्तींना परत करण्यात आल्या. झोनमधील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधून आरोपीचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीला शोधून मोबाइल आणि लॅपटॉप परत करण्यात आले.

आज दहिसर पूर्व इथं 'मोबाइल वापसी'चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात तब्बल 150 च्या वर हरवलेले मोबाईल मुंबई पोलिसांनी वितरीत केले. त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. या कार्यक्रमाचं मागचा उद्देश म्हणजे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढला पाहिजे. जेणेकरून जनतेच्या मनात पोलिसांचा संदर्भात नकारात्मक विचार नाहीस होईल.

या वेळी चोरीला गेलेला आपल्या मोबाईल पुन्हा पोलिसांनी शोधून दिल्यामुळे मुंबईकरांनी पोलिसांचे आभार मानले आणि कौतुकही केलं. मात्र, आपली वस्तूची काळजी आपण घेतली तर चोरीला आळ घालता येईल, याची दक्षता ही जनतेने घेणे महत्त्वाचे आहे.

Mute काढून हा VIDEO पाहा; हॉर्न वाजवणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांची भन्नाट आयडिया

दरम्यान,सध्या लोकांना नियम समजावून सांगण्यासाठी पोलिसांकडून हटके मार्ग वापरले जात आहेत. अनेकदा ट्राफीक पोलिसांनी वेगवेगळे व्हिडिओ, कार्टून, फोटो, गाणी यांचा वापर करून वाहनचालकांना सावध केलं आहे. आता मुंबई पोलिसांनी ट्राफीक जॅम झाल्यानंतर हॉर्न वाजवण्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. याचा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे.

मुंबई पोलिसांनी म्हटलं की, हे डेसीबल मिटर रस्त्यावर गाड्यांच्या हॉर्नचा आवाज ऐकून त्यानुसार काम करतं. या मीटरमध्ये 85 डेसिबलची लेवल सेट करण्यात आली आहे. त्यानुसार सिग्नलवर याचे नियंत्रण राहते.ट्राफीक सिग्नल लागल्यानंतर जेव्हा 85 डेसिबल पेक्षा जास्त आवाज असेल तर रेड ट्रॅफिक लाइटचे वेटिंग टाइम आवाजानुसार वाढेल. म्हणजेच जर ट्रॅफिक लाइट रेड असेल आणि आवाज 85 डेसिबल पेक्षा वाढला तर त्याचे टायमिंग 90 सेकंदापर्यंत वाढेल.

सिग्नलचे टायमिंग वाढण्याची ही प्रक्रिया आवाज 85 डेसिबल कमी होईपर्यंत सुरू राहिल. सध्या या मीटरची चाचणी घेतली जात असून लवकरच ही इतरत्र लावली जातील. पोलिसांनी म्हटलं आहे की, जिथं ट्रॅफिक जास्त असतं असा ठिकाणी मीटर लावण्यात येईल.

लोकांनीही मुंबई पोलिसांच्या या भन्नाट कल्पनेचं कौतुक केलं आहे. दरम्यान, काही लोकांनी शहरातील पोलीस अधिकाऱ्यांचा आवाज कमी करण्यासाठीही असंच काहीतरी करा असंही म्हटलं आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटवर बेंगळुरू पोलिस आयुक्त भास्कर राव यांनी आपल्या शहरातही हे तंत्रज्ञान लागू करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

First published: February 1, 2020, 11:56 PM IST

ताज्या बातम्या