Home /News /mumbai /

‘काहीच केले नाही तर परिणाम तरी कसे मिळणार?’ पार्थ पवारांचा सूचक इशारा

‘काहीच केले नाही तर परिणाम तरी कसे मिळणार?’ पार्थ पवारांचा सूचक इशारा

राजकारण हा लांब पल्ल्यांचा खेळ असल्याने त्यात मागे राहून चालत नाही. सतत सक्रिय राहावं लागतं. त्यामुळे पार्थ यांनी आपली पुढची दिशा काय राहणार याचेही संकेत दिले असं मत राजकीय निरिक्षक व्यक्त करत आहेत.

मुंबई 02 ऑक्टोबर: राज्याच्या राजकारणात पार्थ पवार हे सध्या चर्चेचा विषय आहेत. मराठा आरक्षणावरच्या त्यांच्या भूमिकेवरून राज्यात जोरदार चर्चा झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shara Pawar) यांनी त्यावरून अप्रत्यक्षपणे फटकारलही होतं. आता गांधी जयंतीचा योग साधून पार्थ पवार (Parth Pawar) यांनी सूचक इशारा दिला आहे. गांधीजींचा एक विचार ट्विट करून पार्थ पवार यांनी आपल्या मनातली भावना बोलून दाखवली अशीही चर्चा आता होत आहे. ‘तुम्ही जेव्हा एखादी कृती करता तेव्हा त्याचे परिणाम केव्हा येतील हे तुम्हाला काहीच माहित नसतं. पण तुम्ही काहीच केलं नाही, तर त्याचे परिणाम काहीही मिळणार नाहीत.’ हा गांधीजींचा विचार सांगत त्यांनी अनेक इशारे दिले आहेत. अयोध्येतला राम मंदिराचा प्रश्न, त्यानंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आणि मराठा आरक्षणावर कोर्टात जाण्याचे संकेत या भूमिकांमुळे पार्थ यांच्यावर राष्ट्रवादीतूनच टीका झाली होती. खुद्द शरद पवार यांनी पार्थ यांच्या मताला कवडीची किंमत देत नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे पार्थ यांनी गांधीजींचा आधार घेत आपण सक्रिय राहणार असल्याचेच संकेत दिले आहेत. राजकारण हा लांब पल्ल्यांचा खेळ असल्याने त्यात मागे राहून चालत नाही. सतत सक्रिय राहावं लागतं. त्यामुळे पार्थ यांनी आपली पुढची दिशा काय राहणार याचेही संकेत दिले असं मत राजकीय निरिक्षक व्यक्त करत आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पार्थ यांचे नाव न घेतला फटकारले आहे. या प्रश्नावर सरकार कोर्टात गेलं आहे. त्यावरही आणखी कुणी जात असेल तर जावं, दहा जणांनी जावं असं म्हणत त्यांनी फटकारलं आहे. स्थगिती उठावी हीच सरकारची आणि राष्टरवादीची भूमिका असल्याचंही ते म्हणाले. पवार पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टात स्थगिती उठवणे हे गरजेचं आहे. घटना पीठाकडे सुनावणी जावी यासाठी सरकार आग्रही आहे. आत्महत्या करणं योग्य नाही.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Parth pawar, Sharad pawar

पुढील बातम्या