पेंग्विन दर्शनासाठी आता मोजावे लागणार 100 रुपये ?

पेंग्विन दर्शनासाठी प्रौढांना 100 रुपये तर 12 वर्षाच्या आतल्या मुलांना 25 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 6, 2017 02:03 PM IST

पेंग्विन दर्शनासाठी आता मोजावे लागणार 100 रुपये ?

06 मे : मुंबईकरांना पेंग्विन दर्शन आता महाग होणार आहे. महापालिकेच्या प्रस्तावित भाडेवाढीवर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.  पेंग्विन दर्शनासाठी जास्तीत जास्त 100 रुपये तर कमीत कमी 25 रुपये मोजावे लागणार आहे.

शिवसेनेचा महत्वाकांक्षी पेंग्विन प्रकल्प जोरदार सुरू आहे.दक्षिण कोरियातून काही महिन्यांपूर्वी या राणीबागेत 8 हंबोल्ट पेंग्विन  आणण्यात आले. त्यापैकी एकाचा काही महिन्यांपूर्वी संसर्गाने मृत्यू झाला. त्यानंतर उरलेल्या पेंग्विनना त्यांच्या नव्या घरात हलवण्यात आलंय. आणि मुंबईकरांना दर्शन घेण्यास दार मोकळं केलं.  पेंग्विन पाहण्यासाठी प्रायोगिकत्त्वावर सुरुवातील लहान मुलांचे दर 2 रूपये आणि प्रौढांसाठी 5 रूपये दर ठेवण्यात आला होता. अवघ्या 16 दिवसांत पालिकेच्या तिजोरीत  11 लाख 16 हजार 22 रूपये जमा झाले. पण, आता या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

पेंग्विन दर्शनासाठी प्रौढांना 100 रुपये तर 12 वर्षाच्या आतल्या मुलांना 25 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता फक्त प्रस्ताव मंजुरीची पूर्तता होणं बाकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...