मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे.., राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे.., राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरं सुरू करण्याबद्दल सूचना केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरं सुरू करण्याबद्दल सूचना केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरं सुरू करण्याबद्दल सूचना केली आहे.

मुंबई, 13 ऑक्टोबर : राज्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत अनेक अटी शर्थींसह उद्योग-धंदे, बार-रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरंही उघडण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं खुली करता येणार नाही असं स्पष्ट केले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरं सुरू करण्याबद्दल सूचना केली आहे.

'ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे आहात. तुम्ही अयोध्या राम मंदिरला गेला होता. मुख्यमंत्री झाल्यावर आषाढी एकादशी पंढरपूर येथे पूजा केली.' अशी आठवणच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे.

तसंच, तुम्ही 11 ऑक्टोबर कोरोना संदर्भात संबोधित करताना मंदिर तुर्तास खुले करणे कठीण सांगितले आहे. काही शिष्टमंडळं मंदिर खुले करावे यासाठी भेटले. त्यामुळे हा पत्रव्यवहार करत असल्याचेही राज्यपाल यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रानेच उत्तर दिले आहे.

'आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही' असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

'Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणता गेल्या 3 महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील 3 पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तिन्ही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो' असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

First published: