'त्या' तरुणांचं उत्तर प्रदेशच्या सीमेवरच कांड केलं असतं - योगी आदित्यनाथ

'त्या' तरुणांचं उत्तर प्रदेशच्या सीमेवरच कांड केलं असतं - योगी आदित्यनाथ

'महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये दंगली बंद झाल्या आहे. कारण, आम्ही त्यांचा दोन्ही ठिकाणी बंदोबस्त केला. आम्हाला शांतता राखताही येते आणि क्रांती सुद्धा करता येते'

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी : 'बरं झालं, देवेंद्र फडणवीस तुम्ही कुंभमेळ्यात येणाऱ्या दहशतवाद्यांना महाराष्ट्रमध्ये पकडलं, जर ते उत्तर प्रदेशमध्ये आले असते तर आम्ही त्यांचं सीमेवरच कांड केलं असतं', असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. तसंच 'महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये दंगली बंद झाल्या आहे. कारण, आम्ही त्यांचा दोन्ही ठिकाणी बंदोबस्त केला. आम्हाला शांतता राखताही येते आणि  क्रांती सुद्धा करता येते', असंही ते म्हणाले.

मुंबईत उत्तर भारतीय दिवस कार्यक्रमानिमित्ताने  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं आहे.

कुंभमेळ्यात विषारी रसायन हल्ल्याचा डाव एटीएसने उधळला

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसनं औरंगाबाद आणि मुंब्रामधून 9 संशयितांना ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेण्यात आलेले तरूण हे उम्मत-ए-मोमदिया संघटनेशी निगडीत असल्याचं तपासात उघड झालं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणांकडून घातक रसायनं जप्त करण्यात आली होती. या जीवघेण्या रसायनांचा वापर करून प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात विषप्रयोग करण्याचा डाव होता.

आरोपींकडून ग्लिसरीन, युरिया, एसिटॉन सारखी जीवघेणी रसायनं जप्त करण्यात आली आहेत. औरंगाबादमधून अटक करण्यात आलेल्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

व्हाॅट्सअॅप ग्रुप केला होता तयार

एटीएसने केलेल्या चौकशीत या सर्व संशयितांनी एक व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये आयसिसशी संबंधीत माहिती शेअर केली जात होती. एटीएसने कोर्टात सांगितलं की, या संशयितांनी अनेक चॅट या डिलीट केल्या होत्या. हे संशयित विषारी बाॅम्ब तयार करणार होते अशी माहितीही त्यांच्याकडून मिळाली आहे.

अनेक मोठे कार्यक्रम होते निशाण्यावर

औरंगाबाद आणि मुंब्य्रातून ताब्यात घेतलेल्या संशयित दहशतवाद्यांचा विषारी हल्ला करण्याचा डाव होता. त्यांच्या निशाण्यावर अनेक मोठे कार्यक्रम होते. या कार्यक्रमांमध्ये खाण्याचे पदार्थ आणि पाण्यात विषारी रसायन मिसळून घातपात घडवायचा होता. 9 पैकी 3 दहशतवादी सख्खे भाऊ होते तर इतर 6 जण हे मित्र होते. या ग्रुपमध्ये इतरही लोकं सहभागी असल्याचा संशय आहे.  मुंबई , ठाणे आणि औरंगाबादमध्ये 8 ठिकाणी सर्च आॅपरेशन करून संशयितांना ताब्यात घेतले होते.

या संशयितांनी आपल्या संघटनेचं नाव हे उम्मत ए मोमदिया म्हणजे की 'पैंगबर के बंदे' असं ठेवलं होतं.

================

First Published: Jan 24, 2019 09:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading