रामदेवबाबांनी कृष्णकुंजवर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट

रामदेवबाबांनी कृष्णकुंजवर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट

राजकारण आणि योग या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याची माहिती राज ठाकरे यांच्या निकटवर्तियांनी दिली आहे.

  • Share this:

17 मे : योगगुरू बाबा रामदेव यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन बाबा रामदेव यांनी ही घेतली आहे.

राजकारण आणि योग या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याची माहिती राज ठाकरे यांच्या निकटवर्तियांनी दिली आहे. रामदेव बाबा आणि भाजपची जवळीक सर्वश्रूत आहे. त्यामुळे रामदेव बाबांना राज ठाकरेंना नेमकं आत्ताच का भेटावसं वाटलं, याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी बाबा रामदेव दाखल झाले. आणि त्यानंतर सुमारे अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली.

दरम्यान, या भेटीमागे काही राजकीय कारण होते का? याची माहिती मात्र अजूनही मिळालेली नाही. मात्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

First published: May 17, 2017, 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading