Lockdown : YES BANK घोटाळ्यातले वाधवान बंधू कुटुंबीयांसह खंडाळ्याहून गेले महाबळेश्वरला, गृहमंत्रालयाच्या पत्राने वाद

Lockdown : YES BANK घोटाळ्यातले वाधवान बंधू कुटुंबीयांसह खंडाळ्याहून गेले महाबळेश्वरला, गृहमंत्रालयाच्या पत्राने वाद

गृहमंत्रालयाचे प्रधान सचिव अमिताभ गृप्ता यांच्या लेटरहेडवर वाहतुकीच्या परवानगीचं पत्र आहे.

  • Share this:

मुंबई 09 एप्रिल : DHFL चे प्रमोटर्स आणि YES BANK घोटाळ्यात आरोप असलेले कपील आणि धीरज वाधवान बंधू यांनी लॉकडाऊनची उल्लंघन केल्याचं उघड झालंय. 144 कलमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. हे वाधवान बंधू आपल्या 5 अलिशान कार्स मधून 23 कुटुंबीयांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वरला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही गेले होते. या प्रवासासाठी त्यांनी थेट गृहमंत्रालयातून पत्र मिळालं होतं. या पत्राने वाद निर्माण झाला असून ही परवानगी कुणी दिली याची चौकशी करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

गृहमंत्रालयाचे प्रधान सचिव अमिताभ गृप्ता यांच्या लेटरहेडवर वाहतुकीच्या परवानगीचं पत्र आहे. 8 एप्रिल अशी त्यावर तारीखही आहे. ही मंडळी माझ्या ओळखीची असून कौटुंबिक मित्र आहेत. तातडीच्या कौटुंबिक कामासाठी त्यांना खंड्याहून महाबळेश्वरला जात आहेत. त्यांना तिथे पोहोचता यावं यासाठी सहकार्य करावं असं त्या पत्रात म्हटलं आहे. या पत्रावरून सोमय्या यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

राज्यात संचार बंदी सुरू असतानाच येस बॅक प्रकरणात बेलवर असणारे वाधवा बंधू कुटुंबीयांसमवेत 23 लोकांना VIP पास दिला गेला. मुंबईतून खंडाळा, महाबळेश्वर प्रवास यासाठी कार पास पत्र गृह विभाग सचिव विशेष अमिताभ गुप्ता यांनी दिला असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला. बेलवर असणार वाधवान याना कसा प्रवास पास मिळतो यसंदर्भात चौकशी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी राज्यपाल यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात ज्यांनी पत्र दिले त्या अमिताभ गुप्ता यांच्या प्रतिक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण त्यांचा प्रतिसाद दिला नाही. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

First published: April 9, 2020, 10:53 PM IST
Tags: yes bank

ताज्या बातम्या