मोदींविरोधात यशवंत सिन्हा मैदानात, काँग्रेस नेत्यांसोबत मुंबईत खलबतं

मोदी सरकार हटवण्यासाठी काय करता येईल, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2018 08:23 PM IST

मोदींविरोधात यशवंत सिन्हा मैदानात, काँग्रेस नेत्यांसोबत मुंबईत खलबतं

मुंबई, 31 मार्च : भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत राष्ट्रमंचची बैठक पार पडली. मोदीविरोधी आणि समविचारी लोकांना एकत्र आणण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

दीड ते दोन तास चाललेल्या या बैठकीत 2019 च्या निवडणुका, मोदी सरकार हटवण्यासाठी काय करता येईल, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी सहा सदस्यीय समितीची स्थापना देखील करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून अकोली आणि मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर सभा घेतली जाणार आहे.

दरम्यान, या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे खासदार मजीद मेमन, आपच्या प्रीती शर्मा मेनन, सुधींद्र कुलकर्णी, भाजप आमदार आशिष देशमुख, कुमार केतकर, प्रीतीश नंदी आणि तुषार गांधी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2018 08:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...