मुंबईचा धोका वाढला: खाटा वाढत आहेत, पण डॉक्टर्स, नर्स आणणार कुठून?

मुंबईचा धोका वाढला: खाटा वाढत आहेत, पण डॉक्टर्स, नर्स आणणार कुठून?

मुंबईतील महालक्ष्मी येथील रेसकोर्स पार्किंगमध्ये आणि सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये कोव्हिड सेंटर्स तयार झाले असून डॉक्टर्स आणि नर्सेसची सोय झाली की तिथे रुग्ण दाखल करण्यात येणार आहेत.

  • Share this:

मुंबई 23 मे : देशाला आता चिंता लागलीय ती फक्त मुंबई आणि महाराष्ट्राची.  मुंबईत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या ही धडकी भरवणारी आहे. आकडा दररोज आता हजारातच वाढत असल्याने रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. एवठ्या मोठ्या संख्येने रुग्ण येत राहिले तर त्यांना कुठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण होणार आहे. सरकारही वेगाने तयारी करण्याचा प्रयत्न करत आहे. खाटा वाढविण्याचा प्रयत्न होतोय. पण तेवढे डॉक्टर्स आणि नर्सेस आणयच्या कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईतील महालक्ष्मी येथील रेसकोर्स पार्किंगमध्ये  ६०० खाटांचे कोव्हिड सेंटर तयार झालं आहे.  कोणत्याही क्षणी हे कोव्हिड १९ सेंटरमध्ये रुग्णांची भरती केली जाणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स मधील पार्किंग एरीया खुप मोठा असून दोन टप्प्यात इथे कोविड १९ सेंटर बनवले जात आहे. त्यापैकी एक सेंटर तयार झाले आहे.

एकूण १ हजार २०० खाटा या महालक्ष्मी रेसकोर्स पार्किंग मध्ये तयार केल्या जाणार असुन यांत क्वारनटाईन खाटा, करोना बाधित रुग्णांकरता खाटा आणि व्हेंटिलेटर  विभाग तयार करण्यात येणार आहे. मात्र असं असले तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना आरोग्य सेवा देणारे डाॅक्टर्स, नर्सेस आणि विविध आरोग्य सेवक आणायचे कुठून हा देखील मोठा प्रश्न प्रशासना समोर आ वासून उभा आहे.

कोकणात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चिंता, अहवाल येण्यास लागत आहेत 4 दिवस

मुंबईतील प्रसिद्ध आणि सर्वात जुने महाविद्यालय सेंट झेव्हियर्स देखील सरकारने ताब्यात घेतले असुन तिथे तब्बल ६०० खाटांची निर्मिती केली जात आहे.

कोरोनामुळे रखडली लसीकरण मोहीम; लस न मिळाल्याने तब्बल 8 कोटी मुलांचा जीव धोक्यात

सेंट झेव्हियर्स काॅलजे मधील हाॅल मध्ये जवळपास ३०० खाटांचे हाॅस्पिटल तयार केलं गेलं आहे. तर काॅलेजच्या कॅन्टीन मध्ये १५० आणि काॅलेजच्या चौर्थ्या मजल्यावर १५० अशा एकूण ६०० खाटा सेंट झेव्हिअर्स काॅलेज मध्ये तयार केल्या गेल्या आहेत. या खाटा म्हणजे ३ विभाग असून एका ठिकाणी क्वारंन्टाइन, एका ठिकाणी करोना बाधित रुग्ण आणि एका ठिकाणी व्हेंटिलेटर युक्त खाटा अशी त्याची रचना करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 09:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading