CCTV: प्रेमाचं तिहेरी गणित, प्रेयसी-प्रियकरावर माजी प्रियकराने केले सपासप वार

CCTV: प्रेमाचं तिहेरी गणित, प्रेयसी-प्रियकरावर माजी प्रियकराने केले सपासप वार

मानखुर्दमध्ये प्रेयसी-प्रियकरावर आधीच्या प्रियकराने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • Share this:

मनोज कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 31 ऑक्टोबर : मानखुर्दमध्ये प्रेयसी-प्रियकरावर आधीच्या प्रियकराने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बरं इतक्यावरच हा हल्लेखोर थांबला नाही तर हल्ल्यानंतर त्याने स्वत:देखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आधीच्या प्रियकराने केलेल्या हल्ल्यात तिघेही गंभीर झाले आहेत. तर जखमी आरोपीला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे.

मानखुर्दच्या पी.एम.जी.पी सोसायटीत प्रेमसंबंधातून प्रेयसी आणि तिच्या प्रियकरावर माजी प्रियकराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्याच बरोबर या प्रेमविराने  स्वतःवरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही सगळी घटना परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली.

संशयावरून पत्नीचा खून करून ओंजळीने प्यायला रक्त, पतीला मरेपर्यंत जन्मठेप

सोमवारी संध्याकाळी आरोपी चंद्रकांत साळुंके याचे गेल्या 4 वर्षापासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते दोघेही खासगी कंपनीत कामाला होते. यानंतर चंद्रकांत साळुंके हा पुण्याला एक आयटी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून कामाला लागला तर ही मुलगी मानखुर्द येथील एका पॅथॉलॉजीत मदतनीस म्हणून काम लागली. आणि तिथेच त्याच ठिकाणी कामाला असलेल्या आकाश कांबळेशी प्रेमसंबंध जुळले.

ही माहिती चंद्रकांत याला समजल्यावर तो पुण्याहून मुंबईला आला आणि त्याने या दोघांनाही समवजलं पण त्यांनी ऐकलं नाही. तो गेला आणि संध्याकाळी पुन्हा आला. त्याने आपल्या प्रयेसीला बोलावले आणि जवळ असलेला चाकू काढून तिच्या गालावर सपासप वार केले.

तिने आरडाओरडा केला असता आकाश कांबळे तिचा जीव वाचवण्यासाठी आला. त्याच्याही मानेवर त्याने वार केला. त्यानंतर त्याने स्वतः च्या मानेवरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना स्थानिकांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्यास नेलं. त्या दोघांची तब्येत चांगली असून आरोपीला रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला तर त्यानंतर त्याला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे.

VIDEO: श्रद्धा कपूरला कोणाची तरी नजर लागली - शक्ती कपूर

First published: October 31, 2018, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading