मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी; 129 कोरोनाग्रस्त जेव्हा घरी परततात

VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी; 129 कोरोनाग्रस्त जेव्हा घरी परततात

अशा परिस्थितीत घरातल्या 80 ते 90 टक्के लोकांना व्हायरसची बाधा होत नाही असं आढळून आल्याचं संस्थेचे संचालक डॉ. दिलीप मावळंकर यांनी म्हटलं आहे.

अशा परिस्थितीत घरातल्या 80 ते 90 टक्के लोकांना व्हायरसची बाधा होत नाही असं आढळून आल्याचं संस्थेचे संचालक डॉ. दिलीप मावळंकर यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुक्त झालेल्या 129 जणांचं अगदी खुल्या दिलाने स्वागत करण्यात आलं, तेही देशातला सर्वात धोकादायक हॉटस्पॉट ठरलेल्या वस्तीत. एका बाजूला उपचार करणाऱ्या डॉक्‍टर आणि नर्सेस नाही काही सोसायटी आपल्या आवारात येऊ देत नाहीये तिथे हा समजूतदारपणा नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. पाहा VIDEO

पुढे वाचा ...
मुंबई, 14 एप्रिल : एकीकडे कोरोनाग्रस्तांसाठी सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सवर हल्ले होत आहेत. हे कोरोनाचे योद्धे आमच्या सोसायटीत किंवा वस्तीत नको म्हणून त्यांना वाळीत टाकलं जात आहे, तिथे हे दृश्य नक्कीच डोळ्यात समाधान आणि दिलासा देत पाणी आणाणारं आहे. कोरोनामुक्त झालेल्या 129 जणांचं अगदी खुल्या दिलाने स्वागत करण्यात आलं, तेही देशातला सर्वात धोकादायक हॉटस्पॉट ठरलेल्या वस्तीत. जेव्हा 129 जणांना घरी सोडण्यात आलं तेव्हा विलगीकरणात असलेल्या त्या लोकांचं वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. जिथे एका बाजूला उपचार करणाऱ्या डॉक्‍टर आणि नर्सेस नाही काही सोसायटी आपल्या आवारात येऊ देत नाहीये तिथे वरळी कोळीवाडातील लोकांचं शहाणपण, समजूतदारपणा नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. मुंबई आणि पुणे या Coronavirus च्या हॉटस्पॉटमधली रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजही यात मोठी वाढ झाली. पण त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी आली आहे मुंबईच्या अशाच एका हॉटस्पॉटमधून. मुंबईचा प्रभादेवी आणि वरळी हा सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. तिथून सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल होत आहेत. यात  वरळी कोळीवड्यातील 129 जणांना आज घरी पाठवण्यात आलं. या सगळ्यांवर गेले 14 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची ताजी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आणि 14 दिवसांचा क्वारंटाइन पीरिअड संपल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील हॉस्पिटल मध्ये या सगळ्या कोरोनाग्रस्तांना ठेवलं होतं. त्यातल्या 129 जणांना घरी पाठवण्यात आलं. या सगळ्यांना विलगीकरणात ठेवलेलं होतं. आता त्यांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. आतापर्यंत 250 हून अधिक झाले बरे आजपर्यंत राज्यातून 259  COVID-19 रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 67701 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 5647  लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. संबंधित - Coronavirus : मुंबईत आज नवे 204 कोरोना पॉझिटिव्ह, 11 जणांचा मृत्यू निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी 50 जण करोना बाधित आढळले आहेत. राज्यात आज कोरोनाच्या 350 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 2684 झाली आहे. कोरोनाबाधित 259 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 2247 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 46,588 नमुन्यांपैकी 42808 जणांचे नमुने प्रयोगशाळेत निगेटिव्ह आले आहेत. तर 2684 जण पॉझिटिव्ह आले आहेत. अन्य बातम्या तापाच्या लक्षणांवर आता घरचे उपचार नकोत; पुण्याच्या अधिकाऱ्यांची कळकळीची विनंती लोकांच्या भावनांशी खेळू नका, आग लावण्याचा प्रयत्न केल्यास सोडणार नाही - ठाकरेhe
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

पुढील बातम्या