कसा आहे आदित्य ठाकरेंच्या 'वरळी' मतदारसंघाचा इतिहास?

कसा आहे आदित्य ठाकरेंच्या 'वरळी' मतदारसंघाचा इतिहास?

2014 च्या विधानसभा निवणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे वरळीचे आमदार झाले. त्याआधी 2009 मध्ये सचिन अहिर आमदार झाले. आता सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाचा आदित्य ठाकरेंना किती फायदा होतो हे या लढतीमध्ये कळेल.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबरः युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे वरळी मतदारसंघावर अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे.

वरळी हा दक्षिण मुंबईतला विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. इथून आदित्य ठाकरेंच्या विरोधात आघाडीतर्फे कोण उभं राहणार याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

याआधी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आदित्य यांना बिनविरोध निवडून द्या, अशी विनंती राऊत यांनी या भेटीत केल्याचं सूत्रांकडून समजतं.

काही वर्षांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी बारामतीतून उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे आता संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडे ही मागणी केली असल्याची शक्यता आहे. पवारांनी शिवसेनेची ही विनंती मान्य केली तर पवार कुटुंबातल्या पुढच्या पिढीला म्हणजेच, रोहित पवार किंवा पार्थ पवार यांनाही भविष्यात त्याचा फायदा मिळू शकतो, असाही एक कयास आहे.

निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या ठाकरेंबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

वरळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. शिवसेनेत प्रवेश केलेले सचिन अहिर हे इथून आमदार होते. अहिर यांनी पक्ष बदलला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा नव्या जोमानं लढवण्याच्या प्रयत्नात आहे.

वरळीमध्ये उच्चभ्रू, मध्यमवर्गीय, कामगार वर्ग मोठया संख्येने आहे. इथे बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्नही प्रलंबित आहे.

हीच ती वेळ, आदित्य ठाकरेंचं निवडणूक लढवण्याबाबतचं UNCUT भाषण

2014 च्या विधानसभा निवणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे वरळीचे आमदार झाले. त्याआधी 2009 मध्ये सचिन अहिर आमदार झाले. आता सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाचा आदित्य ठाकरेंना किती फायदा होतो हे या लढतीमध्ये कळेल.

वरळी विधानसभा निवडणूक 2014 निकाल

सुनील शिंदे, शिवसेना - 60 हजार 625

सचिन अहीर, राष्ट्रवादी - 37 हजार 613

हा आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास

1962 – माधव नारायण बिरजे (काँग्रेस)

1967 – माधव नारायण बीरजे (काँग्रेस)

1972 – शरद शंकर दिघे ( काँग्रेस)

1978 - प्रल्हाद कृष्णा कुरणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) (मार्क्सवादी)

1980 - शरद शंकर दिघे ( काँग्रेस)

1985 - विनिता दत्ता सामंत (अपक्ष)

1990, 1995, 1999, 2004 - दत्ताजी नलावडे (शिवसेना)

मतदारसंघ पुनर्रचना

2009 – सचिन अहिर (राष्ट्रवादी काँग्रेस)

2014 – सुनील शिंदे ( शिवसेना)

VIDEO : घरासमोर लिंबू-मिरची टाकली, वृद्ध महिलेला चौघांकडून जबर मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 08:59 PM IST

ताज्या बातम्या