मुंबई, 10 जुलै : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना मुंबई हे सर्वांत धोकादायक मानलं जात असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेली आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावी मॉडेलची सध्या जगभरात चर्चा आहे.
धारावीतील घरांची रचना, गल्ली, लहान घरांमुळे सोशल डिस्टन्सिंग करणे अवघड जाते. त्यामुळे सुरुवातीपासून येथे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पालिकेकडून प्रयत्न केला जात होता. त्यात सुरुवातीच्या दिवसात धारावीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती.
In Vietnam,Cambodia,Thailand, New Zealand, Italy, Spain, South Korea&even in Dharavi, a densely packed area in Mumbai, strong focus on community engagement&basics of testing, tracing, isolating&treating the sick is key to breaking chains of transmission&suppressing the virus: WHO pic.twitter.com/CaliMES9w2
— ANI (@ANI) July 10, 2020
मात्र गेल्या काही दिवसांपासून ही रुग्णसंख्या अत्यंत कमी झाली आहे. यामागे धारावीचे कोरोना मॉडेल फायदेशीर ठरले असल्याचे दिसून येत आहे. यासाठी WHO कडून धारावी मॉडेलचं कौतुक केलं जात आहे. कम्युनिटी स्प्रेड होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या धारावीने कोरोनाला रोखण्यात य़श मिळविले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी (Tedros Adhanom Ghebreyesus) म्हणाले व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, न्यूझीलंड, इटली, स्पेश, साऊथ कोरिया आणि धारावी मॉडेलने कोरोना रोखण्यात यश मिळाले आहे. त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी चाचणी, ट्रेसिंग, आयसोलेशन, आणि कोरोनाची साखळी तोडण्याचे काम प्रामुख्याने केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dharavi