कोरोनाविरुद्ध लढाईत मुंबईचा 'हा' पॅटर्न जगाचा आदर्श, जागतिक बॅंकेने केलं कौतुक

कोरोनाविरुद्ध लढाईत मुंबईचा 'हा' पॅटर्न जगाचा आदर्श, जागतिक बॅंकेने केलं कौतुक

जागतिक आरोग्य संघटनेनंतर आता जागतिक बँकेने मुंबईतील धारावी येथील कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या उपायांचे कौतुक केले आहे.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी सुरुवातीस कोरोनाचा एक मोठा हॉटस्पॉट होती. मात्र डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा आटोक्यात आला. त्यामुळे धारावी कोरोनाशी लढा देणाऱ्या जगभरातील देशांसाठी एक आदर्श बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंतर आता जागतिक बँकेने मुंबईतील धारावी येथील कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या उपायांचे कौतुक केले आहे.

जागतिक बॅंकेने असे म्हटले की, धारावीतील संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टरांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी अखंड मेहनत केली. यामुळेच या समस्येवर तोडगा काढता आला. जागतिक बँकेने आपल्या द्वैवार्षिक अहवालात म्हटले आहे की, मे महिन्यात संक्रमणाची प्रकरणे सर्वाधिक होती, मात्र योग्य पाऊले उचलल्यामुळे तीन महिन्यांनंतर जुलैमध्ये कोरोनाचा प्रसार 20 टक्के कमी झाला.

वाचा-जागतिक बँकेने दिला इशारा : Corona मुळे जगभरातील 15 कोटी नागरिक गरिबीच्या खाईत

जागतिक बॅंकेने केले कौतुक

जागतिक बँकेने 'गरीबी आणि सामायिक समृद्धी' या नावाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मुंबईतील अधिकाऱ्यांनीधारावीतील ताप आणि ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रूग्णांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यासाठी प्रयत्न केले. या मोहिमेमध्ये लोकांना सामील केले. एवढेच नव्हे तर खासगी रुग्णालयांचे कर्मचारीदेखील तैनात केले होते, ज्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला गेला.

जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी

धारावी ही जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे. अडीच किलोमीटर क्षेत्रात ही परसली आहे. धारावीत आठ लाख लोक राहतात. 11 मार्च रोजी मुंबईत कोरोना संसर्गाची पहिली घटना घडली. धारावी येथे 1 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण नोंदवला गेला.

वाचा-कसं सुरू आहे कोरोना लशीचं ट्रायल; जगात सर्वात पुढे कोणती लस? पाहा एका क्लिकवर

जगभरातील 15 कोटी नागरिक गरिबीच्या खाईत

आता जागतिक बँकेने नवीन भीती व्यक्त केली आहे. यामुळे आणखी मोठा फटका बसणार आहे. कोरोनाच्या या संकटामुळं जगभरातील 150 मिलियन म्हणजेच 15 कोटी नागरिक (15 million people in poverty) गरिबीच्या संकटात अडकणार असल्याचं मत जागतिक बँकेने (World Bank) व्यक्त केलं आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालापास ( David Malpass) यांनी ही भीती व्यक्त केली आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत 88 ते 11.5 कोटी नागरिक गरिबीच्या संकटात अडकणार आहेत. तर पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये 15 कोटी नागरिकांना याचाही फटका बसणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 8, 2020, 8:38 AM IST

ताज्या बातम्या